Car Insurance Benefits In Marathi | कार साठी किती प्रकारचा विमा असतो? कोणत्या विम्याचे काय फायदे आहेत? पहा सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रानो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी साईट वरती आज आपण पाहणार आहोत Car Insurance Benefits In Marathi कार विम्याचे फायदे चालते मग जाणून घेऊया.

नवीन कार खरेदी करत असाल किंवा जुन्या कार वरती विमा घेत असला तर हा लेख आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. या लेखामध्ये विम्याची सर्व माहिती सविस्तर दिली आहे.

नवीन कार खरेदी करणाऱ्यांनी कार विमा संरक्षनाबद्दल सर्व माहिती समजून घेतली पाहिजे. कारण अपघात हा कसाही होऊ शकतो तुमची चूक असेल किंवा नसेल, तरी प्रवासादरम्यान अचानक टायर फुटल्याने, बिघाड झाल्याने, निसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती मुळे तुमचे आणि तुमच्या वाहनाचे नुकसान होऊ शकते. यासाठी विमा पॉलिसी खरेदी करणे हा अशा प्रकरणांमध्ये होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा सामना करण्याचा उत्तम मार्ग आहे.

घरबसल्या तहसील चा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व प्रकारच्या कार विमा योजना त्यांच्या पॉलिसीचे अटींवर अवलंबून असतो. कार मधील दुर्दैवी घटनांमुळे झालेल्या आर्थिक नुकसनांपासून संरक्षण देतात. विमा क्षेत्रातील कंपन्या अनेक प्रकारच्या कर विमा पॉलिसी देतात, त्यापैकी काही विमा कंपन्यांची माहिती तुमच्यासाठी देत आहोत. Car Insurance Benefits In Marathi

तिसरा पक्ष दाईत्वा कव्हर ( third party liability only cover)

 • पॉलिसी धारकास थर्ड पार्टी दाईत्व विमा योजना खरेदी करून विशेष कव्हरेज मिळते.
 • या पॉलिसीच्य कव्हरेज मुळे पॉलिसी धरकाच्या वाहनाला दुसऱ्या व्यक्तीचे किंवा त्याच्या वाहनाचे नुकसान झाल्यास कायदेशीर दयित्वामध्ये सवलत मिळते.
 • थर्ड पार्टी लायबिलिटी सह कार इन्शुरन्स कव्हरेज पॉलिसी धरकाला थर्ड पार्टी म्हणजे तूमची कार ज्या वाहनाला टक्कर देते त्या वाहनाची दुरुस्ती किंवा बदली खर्च
 • आपघातात कोणत्याही व्हेक्तीला दुखापत झाल्यास दवाखाना आणि दाखण्याच्या खर्च
 • समोरच्या पक्षाच्या मृत्यूमुळे उद्भवणारे संरक्षण मिळते.
 • खर्च केलेल्या दयित्वंसाठी कव्हरेज मिळते.
 • मोटार वाहन कायद्यानुसार थर्ड पार्टी विमा असणे बंधनकारक आहे.
 • या पॉलिसी ची कव्हरेज म्हणजे विम्याची रक्कम इतकी ज्येष्ट असावी की समोरच्या बाजूचे नुकसान झाल्यास तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे द्यावे लागणार नाहीत.

टक्कर नुकसान किंवा स्वतःचे नुकसान कव्हर ( collision damage or own damage cover)

 • तुम्ही तुमच्या कार साठी कोलिशन डामेज किंवा स्वतःचे नुकसान कव्हर किंवा ओडी कव्हर खरेदी करता.
 • तेव्हा या पॉलिसी अंतर्गत अपघातात झालेले कार चे नुकसान दुरुस्त करण्यासाठी आलेला खर्च विमा कंपनी उचलेल.
 • कंपनीकडून नुकसानग्रस्त कार ची किंमत कार चे वय आणि कारचा विमा घोषित मूल्य IDV यावरती अवलंबून असते.
 • याशिवाय संबंधित पॉलिसीचे प्रीमियम ही विचारात घेतला जातो.
 • कारचे विमा उतरविलेले घोषित मूल्य तिच्या बाजार भावाच्या आधारावर ठरविले जाते.
 • दमेज कव्हरेज पोलोसीमध्ये कारच्या निर्मात्याने ठरवल्या विक्री किमतीमध्ये कारच्या भागाचे संचित घसारा वजा करून IDV मूल्याची गणना केली जाते.
 • जर तुम्ही कार कर्जावर घेतली असेल तर यासाठी नीच्छित पने ही तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.

वयक्तिक अपघात कव्हर ( personal accident cover)

 • वैयक्तिक अपघात कार विमा पॉलिसी अपघातानंतर सर्व वैद्यकीय खर्च कव्हर करून कारच्या मालकाचे (ड्रायव्हर) संरक्षण करते.
 • जे लोक कामासाठी वारंवार प्रवास करतात त्यांच्यासाठी वयक्तिक अपघात कार विमा पॉलिसी खूप महत्वाची आहे.

शून्य घसारा विमा (zero depreciation insurance)

 • भारतातील कार साठी शून्य घसरा विमा पॉलिसी चे कव्हरेज अड ऑन म्हणून उपलब्ध आहे.
 • उदर्णार्थ कल्पणाकरा की तुमची कार खराब झाली आहे, आता आपल्याला खराब झालेले भाग बदलण्याची आवश्यकता आहे
 • त्यामुळे सामान्य विम्याच्या बाबतीत दावा निकाली काढताना दमेजे भागाचे घसारा मूल्य विमा कंपनी विचारात घेईल.
 • तर दुसरीकडे जर तुम्ही कार वर शून्य घसरा कव्हर घेतले असेल तर विमा कंपनी कडून पॉलिसी धरकाला नुकसान झालेला भाग बदलण्याच्या खर्चाचा दावा करून संपूर्ण रक्कम दिली जाईल.
 • अन्ई या प्रकरणात नुकसान झालेल्या भागाचे घसरा मूल्य विचारात घेतले जाणार नाही.
 • शून्य घसारा विमा टायर त्युब आणि बॅटरी वगळता तुमच्या कारचे सर्व भाग 100 टक्के कव्हर करतो
 • ॲड ऑन टायर ट्युब आणि बॅटरी वर फक्त 50 टक्के कव्हर ऑफर करते.
 • साधारणपणे किंवा कंपन्या पॉलिसीच्या कार्य काळात केवळ 2 घसारा दाव्याना परवानगी देतात.

सर्व समावेशक कर विमा (comprehensive car Insurance)

 • सर्व समावेशक कार विमा पॉलिसी मध्ये पॉलिसी धारकाला जास्तीत जास्त संरक्षण कव्हरेज मिळते.
 • हे तृतीय पक्ष दायित्व, वाहनांचे नुकसान, वयक्तिक अपघात कव्हर आणि वादळ पुर, अग, चोरी या सारख्या सर्व प्रकारच्या गैर टक्कर नुकसानसाठी संरक्षण प्रदान करते.
 • निवडक आडऑन च्या मदतीने सर्व समावेशक कर विमा पॉलिसी अनखीन मजबूत केली जाऊ शकते.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा