Employment Registration Online | ऑनलाईन महास्वयम रोजगार नोंदणी; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Employment Registration Online ऑनलाईन महास्वयम रोजगार नोंदणी बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, आपल्याला माहीतच आहे आपल्या देशात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या मनुष्यबळाचा पूर्णपणे उपयोग व्हावा या करिता भारताला जगाची मानव संसाधनाची राजधानी बनविण्याचे धोरण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. या संकलपणेला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2022 पर्यंत 4.5 कोटी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे उद्देश ठेवले आहे. आपल्याला माहीत आसल्या प्रमाणे पूर्ण देशामेध महाराष्ट्र राज्य हे मनुष्यबळाच्या दृष्टीकोनातून दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्र सरकारला हे उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी 45 लक्ष मनुष्यबळाची गरज असेल या उद्देशाने रज्याद्वरे मोठ्या प्रमाणात दर वर्षी कुशल मनुष्यबळ निर्माण केले जाईल.

महा स्वयम् बेरोजगारी भत्ता मिळणार 5000 रुपये प्रति महा

आपण पाहतच आहात महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत जे रोजगाराच्या शोधत असतात परंतु त्यांना रोजगार शोधण्यास अत्यंत काठीनाईचा सामना करावा लागतो. या सर्व बाबी लक्षात घेता राज्य शासनाने Employment Registration Online महास्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देणार आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या शासनाचा उद्देश आहे.

Employment Registration Online महाराष्ट्र महास्वयम रोजगार नोंदणी

महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी तसेच रोजगार शोधणाऱ्या तरुणांना सुविधा निर्माण करून देण्यासाठी या पोर्टलची सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारने स्वयम् पोर्टल हे शासनाच्या विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणारे उद्योजक व कौशल्य संबंधित उद्योगामधील रोजगार आणि कुशल मनुष्यबळ यांना विकसित करण्यासाठी एकत्रित आणले आहे. या पोर्टलवर कुशल मनुष्यबळाची माहिती उपलब्ध करता येईल तसेच प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल. या वेब पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या उमेदवारास एकच प्लॅटफॉर्म वर कौशल्य समंधित उपक्रम व कौशल्य विकास आणि उपलब्ध रोजगार या संबंधित संपूर्ण एकत्रित माहिती उपलब्ध होणार आहे. या वेब पोर्टल वरती उमेदवारांना एकाच क्लिक वरती रोजगारा संबंधित सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

Employment Registration Online Benefits या योजनेअंतर्गत मिळणारे फायदे

 • या ऑनलाईन वेब पोर्टलचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुणांना मिळणार आहे.
 • राज्यातील जे युवक रोजगार, नोकरीच्या शोधात आहेत ते या वेब पोर्टल द्वारे आपली ऑनलाईन नोंदणी करून रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतात.
 • या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील कोणत्याही प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण, नौकऱ्याच्या जागा आणि उद्योजकता विकासाशी संबंधित एकच ठिकाणी सोप्या पद्धतीने मिळू शकते.
 • प्रशिक्षण संस्था पोर्टल वर स्वतःची नोंदणी देखील करू शकतात,आणि स्वतःची आणि त्यांच्या संस्थेची येथे जाहिरात करू शकतात.
 • या सोबतच प्रशिक्षणासाठी नोंदणी करून ते येथून नोंदणी शुल्क देखील मिळवू शकतात.
 • या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणे सोपे होणार आहे.
 • राज्यसरकारने या पोर्टल द्वारे विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या असून, भारत सरकारच्या कौशल्य प्रशिक्षण अभियानाचाही या पोर्टल द्वारे प्रचार करण्यात येत आहे.
 • या पोर्टल वरती नोंदणी करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या नोकरी संबंधित माहिती, कौशल्य विकास प्रशिक्षण माहिती, रोजगार मेळावा ई. माहिती मिळू शकते. या शिवाय ते येथून नोकरीसाठी स्वतःची नोंदणी देखील करू शकतात.

महा स्वयम् रोजगार नोंदणी पात्रता काय

Employment Registration Online Eligibility
 • 14 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती नोकरी शोधणारे म्हणून अर्ज करू शकते.
 • या पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • उमेदवाराला शैक्षणिक पात्रता, अनुभव, संपादन केलेली कौशल्य, संपर्क तपशील इत्यादी माहिती वेळोवेळी अपडेट करावी लागेल.
 • नोकरी शोधणाऱ्या साठी केवळ बेरोजगार नोंदणीच करू शकतात.
महा स्वयम् रोजगार नोंदणी पोर्टल उपलब्ध सुविधा.
Employment Registration Online Features
 • कॉर्पोरेशन प्लॅन
 • स्वयं रोजगार अर्ज
 • स्वयं रोजगार योजना
 • नोकरी शोधणे
 • ऑनलाईन कर्जाची पात्रता.
 • हेल्प लाईन क्रमांक
 • कर्ज परतफेड स्थिती
 • रोजगारासाठी अर्ज करणे

Employment Registration Online Documents लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

 • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 • कौशल्य प्रमाणपत्र मिळविले.
 • पत्याचा पुरावा
 • आधारकार्ड
 • आमदार किंवा खासदार यांनी दिलेले प्रमाणपत्र
 • नगर परिषद किंवा ग्राम पंचायत यांनी दिलेले प्रमापत्र
 • राजपत्रित अधिकारी किंवा शाळा प्रमुखांचे प्रमाणपत्र
 • आई किंवा वडिलांचा राज्य नोकरीचा पुरावा.
 • मोबाईल क्रमांक
 • पासपोर्ट आकाराचा फोटो.

महा स्वयम् रोजगार ऑनलाईन नोंदणी पद्धत

Employment Registration Online Online Registration
 • या साठी तुम्हाला आम्ही दिलेल्या खली राखण्यात शासनाच्या अधिकृत वेबसाईट भेट द्यावी लागेल.
 • वेबसाईट वरती गेल्यानंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल
Employment Registration Online
 • येथे आल्यानंतर तुम्हाला “रोजगार” हा पर्याय दिसेल या वरती तुम्हाला क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
 • या नवीन पेज वरती तुम्हाला “नोंदणी” हा पर्याय दिसेल, त्या वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
 • या नंतर तुमच्या समोर एक नवीन नोकरी फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे.
 • माहिती भरल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड टाकून नेक्स्ट वरती क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, तिथे तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर एक OTP प्राप्त होईल. हा मिळालेला OTP समोरील बॉक्स मध्ये टाकावा व “कन्फर्म” वरती क्लिक करावे.
 • आता तुमच्या समोर एक नवीन फॉर्म ओपन होईल या मध्ये तुम्हाला तुमचा वयक्तिक तपशील आणि संपर्क तपशील इत्यादी माहिती भरावी लागेल.
Employment Registration Online
 • अशा प्रकारे वरील सर्व माहिती अचूक भरल्या नंतर तुम्हा “क्रिएट अकाउंट” वरती क्लिक करावे लागेल.
 • या नंतर तुमच्या मोबाईल वरती ईमेल आयडी मॅसेज येईल. या नंतर तुम्ही “सबमिट” बटण वरती क्लिक करा.
 • अशा प्रकारे तुमची महा स्वयम् रोजगार पोर्टल नोंदणी पूर्ण होईल.
 • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला रजिस्टर आयडी आणि पासवर्ड मिळेल. या नंतर नोकरी शोधणारे rojgar.mahawayam.in वरती लॉग इन करू शकतात.
 • अर्जदाराला रोजगार नोंदणीच्या वेळी मिळालेल्या आयडी आणि पासवर्ड वापरून पुन्हा कधीही या पोर्टल वरती लॉग इन करू शकतो. या करिता आयडी आणि पासवर्ड वेवस्थीत सांभाळून ठेवा.
योजनेचे नावEmployment Registration Online
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
लाभार्थीराज्यातील बेरोजगार तरुण
ने सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
उद्देशबेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे
विभागाचे नावकौशल्य विकास, रोजगार आणि पर्यावरण प्रशिक्षण महाराष्ट्र
वर्ष2023
राज्यमहाराष्ट्र राज्य
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.