Gram Panchayat Gharpatti Online | ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन कशी भरायची, पहा सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपली योजना या साईट वरती आज आपण पाहणार आहोत Gram Panchayat Gharpatti Online बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

ग्राम पंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर ग्राम पंचायत चे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीस शासन मार्फत वेगवेगळ्या योजना अंतर्गत निधी जरी मिळत असला तरी तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठी खर्च करावा लागतो.

Gram Panchayat Gharpatti Online ग्राम पंचायत मधील अनेक सुविधा या ऑनलाईन आहेत. ग्रामपंचायत दाखले, उतारे हे मोबाईलवरून मागणी करता येणार आहे. अश्या प्रकारच्या अनेक सुविधा या ऑनलाईन होत आहेत.

महाराष्ट्रातील सर्व ग्राम पंचायत ह्या पापर लेस होत आहेत. आपल्याला जर घरपट्टी, पाणी पट्टी, इमारतीवरील कर, पडसर कर, आरोग्य कर, दिवाबत्ती कर ई. भरण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये जावे लागत असे. परंतु आता आपण मोबाईल वरून काही मिनिटातच हे कर ऑनलाईन भरू शकतो.

घरपट्टी कर, पाणीपट्टी कर हे ऑनलाईन भरल्यामुळे नागरिकांचा यामध्ये खूप वेळ वाचणार आहे. तसेच आपल्या वेळेनुसार आपल्याला कर भारत येईल, त्याच बरोबर इतर सुविधांचा सुद्धा लाभ घेता येईल. त्याच बरोबर ग्राम पंचायत मधील इतर महत्त्वपूर्ण दाखले, उतारे हे सुधा ऑनलाईन मिळतील. काही ग्रामपंचायत मध्ये ही सुविधा सुरू झाली असून या नोजनेचा अनेक नागरिक लाभ घेत आहेत. या मुले ग्राम पंचायत मध्ये जाण्याची गरज नाही.

ग्रामपंचायत खाली येणारी कामे

 • गावाला दैनंदिन पाणी पुरवठा करणे,
 • पाणी पुरवठा येवजनेची दुरुस्ती व देखभाल करणे,
 • ब्लिचिंग पाऊडर खरेदी,
 • वीज बिल भरणे,
 • कर्मचाऱ्यांची पगार करणे,
 • गावातील स्वच्छ्ता,
 • किरकोळ रस्ते दुरुस्ती,
 • गतर दुरुस्ती,
 • रस्त्यावरील दिवा बत्तीची सोय करणे
 • कार्यालयीन खर्च या सारख्या अनेक नित्याची कामे ग्राम पंचायतीला करावी लागतात.
 • ही कामे करण्यासाठी ग्राम पंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक आहे.
 • घर पट्टी आणि पाणी पट्टी यातून जमहिनाऱ्या निधीतून वरील इतर वा आवश्यक कामे ग्रामपंचायतीस करणे आवश्यक होते.
 • त्यामुळे प्रत्येक मालमत्ता धारक यांनी आपला घरपट्टी, पाणीपट्टी कर व इतर करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक आहे.
 • ग्रामपंचायत ही एखाद्या कुटुंब प्रमाणे असते.
 • जसे ज्या कुटुंबात पैसा येईल ते कुटुंब त्याच्या आर्थिक गरजा भागवू शकते,
 • तसेच जर ग्राम पंचायतीला घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करातून जर पैसा जमा झाला तर ग्राम पंचायत गावातील आवश्यक कामे व गरजा पूर्ण करू शकते.
 • महाराष्ट्र ग्राम पंचायत आधी नियम व ग्राम पंचायत कर फी नियम ( सुधारणा ) 2015 मधील तरतुदी नुसार ग्रामपंचायतीचा कर हा प्रत्येक मालमत्ता धरकला भरवाच लागतो,
 • तो कधीही माफ होत नाही. तसेच थकबाकी रकमेवर दरवर्षी 5 टक्के व्याज सुधा भरावे लागते.

मुख्यमंत्री सहायता निधी योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन कशी भरायची? पहा संपूर्ण प्रोसेस.

घरबसल्या ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन भरण्यासाठी खाली दिलेल्या राज्य सरकारची पोर्टल ओपन करा.

https://pg.gov2egov.com

नागरिक नोंदणी (citizen registration)

आता इथे नागरिक नोंदणी करण्यासाठी तुमचे नाव, लिंग, ई – मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक टाका. नोंदणी केल्या नंतर मोबाईल नंबर आणि ई – मेल आयडी वर युसर नेम आणि पासवर्ड येईल.

वापरकर्ता लॉगिन (user login)

आता येथे युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

पोर्टल लॉगिन झाल्यानंतर तिथे विविध सेवा दिसतील त्या मध्ये कर भरणा या सेवा पर्यायावर क्लिक करा.

आता पुढे मालमत्ता आणि पनिकर शोधा. आपला जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, प्रॉपर्टी आणि पाणी मिळकत नंबर सलेक्ट करून आपली माहिती सर्च करा

पुढे मालमत्ता आणि कर तपशील कनेक्शन पहा आणि Add Conection करा.

 • तुम्हाला पुढे If Information Is correct then add Conection
 • असा मॅसेज येईल, जर माहिती बरोबर असेल तर OK वरती क्लिक करा.
 • आता आपण पाहू शकतो मिळकत नंबर अड झाल्याचा मॅसेज दिसेल पुढे
 • ” click here to make a payment” या पर्यायावर क्लिक करा.

पुढे Pay Now हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा आणि तुमच्या ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी कराचे पेमेंट ऑनलाईन करा.

वरील लेख आपल्या सर्व मित्र, गावकऱ्यांना शेर करा आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास आम्हाला कॉमेंट करा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा