home loan | होम लोण घेताय? आधी हे पहा! होम लोण बद्दल संपूर्ण माहिती:

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत home loan होम लोन बद्दल संपूर्ण माहिती, होम लोन घेण्यासाठी पात्रता काय? कागदपत्रे कोणती लागतात, होम लोन अर्ज कसा करावा, होम लोन का नाकारले जाते? होम लोनचा इंटरेस्ट रेट किती असतो अशा अनेक प्रकारच्या प्रशांबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत या लेखात याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा.

मित्रानो, home loan घर घेणे हे सर्वांचे स्वप्न असते आपल्या स्वतःचे हक्काचे घर घेण्यासाठी माणूस आयुष्य पणाला लावतो तरी देखील अनेकांना घर घेणे शक्य होत नाही. आत्ताच्या काळात घर घेयचे म्हंटले की सर्वात आधी आपल्या समोर पहिली गोष्ट येते टी म्हणजे घराची किंमत. आपण पाहतच आहात की घराच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.त्यातच मध्यम वर्गीय सर्व सामान्य नागरिकांना आपले हक्काचे घर घेणे खूपच कठीण झाले आहे. अशा वेळी आपल्याला घर खरेदी करण्यासाठी बँकचा आधार घ्यावा लागतो. बँक आपल्याला गृह कर्ज देते याच्या मार्फत आपण घर घेऊ शकतो.

ऑनलाईन संस्था नोंदणी कशी करावी पहा येथे

गृहकर्ज एक अशी सुविधा आहे ज्या मध्ये आपल्याला बँक ठराविक रक्कम कर्जच्या स्वरूपात प्रदान करते. ती मिळालेली रक्कम आपण प्रती महिना EMI च्या स्वरूपात परतफेड करू शकतो. याच प्रक्रियेला होम लोन असे म्हणतात. होम लोन केवळ आपल्याला घर विकत घेण्यासाठीच नाही तर घर दुरुस्ती करण्यासाठी, नवीन घर बांधण्यासाठी सुद्धा बँक आपल्याला होम लोन देते. त्यासोबतच PM Awas Yojana अंतर्गत सरकार आपल्याला घर बांधण्यासाठी 2 ते 3 लाख रुपयांचे गृह कर्ज देऊ शकते.

home loan

type of home loan

होम लोन चे प्रकार

 • घराच्या बांधकामासाठी कर्ज loan for construction of a hous
 • जमीन खरेदी साठी कर्ज loan for purchase of land
 • स्टॅम्प ड्युटी लोन stamp duty loan
 • बलेन्स ट्रान्स्फर होम लोन balance transfer home loan
 • गृह रूपांतर कर्ज home conversion loan
 • ब्रिग्द कर्ज bridged loan
 • गृह सुधारणेसाठी कर्ज loan for home improvement
 • देशाबाहेरून येणाऱ्या भारतीयांसाठी कर्ज NRI home loan
 • गृह विस्तार कर्ज house expansion or extension loans
 • गृह खरेदीसाठी कर्ज loan for home purchase

What is home loan? होम लोन म्हणजे काय?

होम लोन म्हणजे एखादी बँक किंवा सस्था तुमची आर्थिक परिस्थिती पाहून तुम्हाला घर खरेदी करण्यासाठी किंवा घराचे बांधकाम करण्यासाठी आर्थिक मदत करते. आणि या रक्कम वरती एक ठराविक व्याजदर असते. बँकेने दिलेली आर्थिक रक्कम ही बँक ठराविक वेळेवर मुद्दल आणि व्याज अशा रीतीने आपल्याकडून परतफेड करून घेण्यात येते. होम लोन हे फक्त नवीन घरा वरती घेतले जाते असे नाही. होम लोन हे अनेक प्रकारच्या कारणांसाठी घेतले जाते, जसेकी घर दुरुस्तीसाठी किंवा घराची डागडुजी करण्यासाठी या करितही होम लोन मिळते. होम लोन चा एक फायदा असा आहे की तुमची बचत तुम्हा मोडावी लागत नाही. जोपर्यंत तुमच्या घरा वरती कर्ज आहे तो पर्यंत तुमची मालमत्ता बँकेकडे गहाण असते. जर तुम्ही वेळेवर काजाचे हप्ते भरले नाही किंवा हप्ते भरण्यास टाळाटाळ करत असाल तर अशा परिस्थितीत बँक तुमची मालमत्ता जप्त करू शकते.

home loan

गृह कर्ज चा व्याजदर हा 6.65 पासून पुढे सुरू होतो. कर्ज देणारी बँक किंवा संस्था कर्ज रकमेच्या 75 ते 90 टक्के कर्ज देते. दिलेली रक्कम आपल्याला 30 वर्षाच्या कालावधित सुलभ हप्त्यात परतफेड करता येते.

होम लोन चे फायदे

home loan benefits
 • ज्या बँक किंवा संस्था होम लोन देतात त्यांचे व्याज दर खूपच कमी असते, कारण होम लोन घेणाऱ्या व्यक्तीला परवडणारे असावे आणि मासिक हप्ता ही वेळेवर भरणा व्हावा
 • बँक आणि संस्था यांच्या मध्ये होम लोन देण्यासाठी पर्धा असते म्हणून ते व्याज दर कमी ठेवतात व ग्राहक आपल्याकडे आकर्षित करतात.
 • जर तुम्ही पहिल्यांदा घर खरेदी करत असाल आणि तुमच्या नावे कोणतीही मालमत्ता नसेल तर तुम्हाला कलाम 80 ई ई अंतर्गत कर्जावर भरलेल्या व्याजावर 50 हजार रुपयांपर्यंतचा कपातीचा दावा करू शकतात.
Fees fro home loan
होम लोन घेताना लागणारे विविध शुल्क
 • प्रकिया शुल्क होम लोन घेता वेळेस तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो. सर्व बँका वित्तीय संस्था प्रक्रिया शुल्क आकारात नाहीत.
 • पेमेंट मोडफिस मध्ये बदल:- होम लोन घेणारा व्यक्ती कर्ज कालावधीत फेडत असताना पेमेंट मोड मध्ये बदल करतो तेव्हा देखील फी आकारली जाते. ही आकारण्यात येणारी फी प्रत्येक बँकेनुसर वेगवेगळी असते.
 • प्रशासकीय शुल्क :- बँकेकडून होम लोन घेताना आपल्याला प्रशाकिय शुल्क आकारले जात नाही. परंतु संस्था मात्र प्रधकीय शुल्क आकारतात.
 • EMI बाऊन्स फी :- जेव्हा आपण EMI रक्कम भरली नसेल किंवा बँक खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध नसेल तर जेव्हा EMI चेक बाऊन्स होतो तेव्हा आपल्याला 50प रुपये फी भरावी लागते.
 • कायदेशीर शुल्क :- अनेकदा बँक होम लोन देताना सल्लागाराची मदत घेतात तेव्हा देखील आपल्याला कायदेशीर शुल्क भरावा लागतो. यामध्ये वकिलांच्या फी चा समावेश असतो.
home loan

home loan tearm and conditions होम लोन करिता अटी

 • किमान मासिक वेतन 25 हजार रुपये असावे.
 • वय मर्यादा 18 ते 70 दरम्यान असणे आवश्यक आहे
 • 750 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर असणे अनिवार्य आहे.
 • अर्जदार हा भारताचा रहिवाशी असावा
 • वंशाचा व्यक्ती असणे आवश्यक आहे.
 • नोकरीच्या ठिकाणी किमान 2 वर्ष
 • व्यवसाय असल्यास किमान 3 वर्ष जुना असावा.

होम लोन साठी अर्ज नाकारण्याची कारणे what are the reason for rejection of home loan application

 • वार्षिक उत्पन्न कमी असणे
 • इतर बँकेने देखील कर्जाचे अर्ज नाकारणे
 • कमी क्रेडिट स्कोअर
 • क्रेडिट अहवालात चुकीची माहिती.

documents required for home loan

होम लोन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • होम लोन अर्ज
 • मालमत्ते सबंधित कागदपत्रे – बिल्डर कडून NOC, बांधकाम खर्चाचा तपशील, इमारत योजना मंजूर प्रत.
 • उत्पन्न दाखला – मागील 3 वर्षांपासूनचा आयकर परतावा असलेला
 • निवासाचा पत्ता – बँक पासबुक, मतदान कार्ड, रेशन कार्ड
 • पासपोर्ट आकाराचे फोटो.
 • मोबाईल क्रमांक.

home loan apply होम लोन करिता अर्ज प्रक्रिया.

होम लोन करिता अर्ज करण्यासाठी आपल्याला वरती दिलेले सर्व कागदपत्रे घेणं बँकेत जावे लागेल आणि तेथून होम लोन साठीचा अर्ज घेऊन त्यातील सर्व माहिती भरून सर्व कागदपत्रे जोडून जमा करावा, त्यानंतर तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची तपासणी करून तुम्हाला कळविण्यात येईल

योजनेचे नाव home loan
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
श्रेणीगृह कर्ज योजना
लाभार्थीभारतीय नागरिक
वर्ष2023
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.