Jan Dhan Yojana | जन धन योजना; खातेदारांना मिळणार 10 हजार रुपये: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Jan Dhan Yojana जन धन योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रांनो, केंद्र सरकार देशातील सामान्य नागरिकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित असते. या योजनेअंतर्गत देशातील गरीब व मध्यमवर्गीय कुटंबाचा आर्थिक व सामाजिक विकास व्हावा या हेतूने सरकार अशा प्रकारच्या योजना राबवित असते, त्यात अशीच एक योजना आहे Jan Dhan Yojana जन धन योजना या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना ज्यांचे जन धन खाते आहे अशांना 10 हजाराचा आर्थिक लाभ मिळणार आहे. आपण या लेखात आज या बद्दल सर्व माहिती पाहणार आहोत, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून सविस्तर माहिती जाणून घ्यावी.

Jan Dhan Yojana

जन धन ही योजना प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्याच्या तटबंदीवरुन जाहीर केली होती. PMJDY ने मूलभूत बँकिंग खाते आणि डेबिट कार्ड सह अपघात विमा संरक्षण देते. प्रत्येक कुटुंबासाठी किमान एक मूलभूत बँकिंग खाते, आर्थिक साक्षरता आणि क्रेडिट, विमा आणि पेन्शन सुविधांसह सार्वत्रिक लाभ प्रदान करते. यामध्ये ग्रामीण आणि शहरी अशा दोन्हीही भागांचा समावेश आहे.

ज्या नागरिकांचे आत्तापर्यंत कोणत्याही बँकेत खते नाही अशा नागरिकांना जन धन योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. आपल्या राज्यात अशे बरेचशे नागरिक आहेत की ज्यांच्याकडे इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेशी संबंधित कसलीही माहिती नाही. अशा नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने सरकारने जन धन योजना सुरू केली आहे. देशातील प्रत्येक नागरिक या योजनेचा लाभ घेऊन बँकेमध्ये आपले खते उघडू शकतात.

Jan Dhan Yojana

या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत जर एखादा पात्र लाभार्थी खाते उघडल्यानंतर मरण पावल्यास, केंद्र सरकार कडून लाभार्थीच्या कुटुंबाला 30 हजार रुतांचे अतिरिक्त विमा संरक्षण दिले जाईल. या योजनेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील नागरिक सहज पद्धतीने आपले जन धन खाते उघडू शकतात, या करिता कोणतेही अतिरिक्त पैसे आकारले जात नाही. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना सहज सेवा उपलब्ध होणार आहे.

उद्योग व्यवसाय करण्यासाठी मिळणार त्वरित कर्ज लाहा येथे

या योजनेअंतर्गत 8 वर्षात 46 कोटीहून अधिक खाते उघडण्यात आली.

योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. आता या योजनेला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत तर 8 वर्षात 46 कोटींहून अधिक खाते उघडण्यात आले. ज्यामध्ये 1.74 लाख कोटी रुपये जमा आहेत, देशाच्या केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की या योजनेच्या साहाय्याने देशातील 68 टक्के ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तर 56 टक्के महिलानी या योजनेअंतर्गत आपले खाते उघडले आहेत.

Jan Dhan Yojana

Jan Dhan Yojana या योजनेअंतर्गत सरकार देणार 10 हजार रुपये

या योजनेअंतर्गत जन धन खातेदारांना सरकार देणार आहे 10 हजार रुपये, या करिता खातेदाराला आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन एक अर्ज करावा लागेल. या योजनेचे इतर अनेक फायदे आहेत जासेकि 1 लाख 30 हजार रुपयांचा विमा संरक्षण उपलब्ध आहे. आणि खातेदारांना आपल्या खात्यात शिल्लक ठेवण्याची गरज नाही, या शिवाय खातेदारांना एक डेबिट कार्ड ही दिले जाणार आहे. तुम्हाला लाभ गेयचा असल्यास तुम्ही या खात्यावर 10 हजार रुपयांचा ओव्हर ड्राफ्ट घेऊ शकता. या करिता आपण आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधू शकता आणि लाभ घेऊ शकतात.

Jan Dhan Yojana Purpose योजनेचा उद्देश

 • देशातील सर्व गरीब नागरिक कोणत्याही प्रकारच्या योजनांपासून वंचित राहू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • या योजनेअंतर्गत देशातील सर्व नागरिकांना बँकेशी संबंधित सर्व सुविधांचा लाभ मिळवून देणे
 • या योजनेअंतर्गत देशातील नागरिक झिरो बलेंस चे खाते उघडू शकतात.
 • या योजनेअंतर्गत देशातील सर्व नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे.
 • आर्थिक सेवा उपलब्ध करून देणे.

जन धन योजनेचे फायदे

Jan Dhan Yojana Benefits

 • या योजनेअंतर्गत 10 वर्षाच्या मुलाचे खाते देखील उघडू शकता.
 • या योजनेअंतर्गत खाते उघडल्या खातेदाराला 1 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण दिले जाईल.
 • या योजनेअंतर्गत खातेदाराच्या काही अटींच्या आधारे मृत्यू नंतर त्यांच्या कुटुंबाला 30 हजार रुपये दिले जातील.
 • या योजनेअंतर्गत खातेदाराला त्यांच्या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही.
 • सर्व सरकारी योजनांचे आर्थिक अनुदानाचे पैसे या बँक खात्यात हस्ततंतरी केले जातील.
 • या योजनेच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.
 • आपत्तीच्या काळात या खातेदारांना सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ दिला जाईल.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 10 हजार रुपयांचे कर्ज घेण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.

Jan Dhan Yojana Documents या योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • भारताचे कायमचे रहिवाशी प्रमाणपत्र.
 • लाभार्थ्यांचे वय 18 ते 59 असणे अनिवार्य आहे.
 • सरकारी सेवेत नोकरी करत असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • कर भरणारे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
 • खाते उघडण्यासाठी खातेदाराच्या कोणत्याही बँकेत बचत खाते नसावे.
 • 10 वर्षाच्या मुलाला या योजनेतून खाते उघडता येते.
 • मोबाईल क्रमांक.
 • आधार कार्ड.
 • पॅनकार्ड.
 • मतदान कार्ड
 • राशन कार्ड
 • पासपोर्ट आकाराचे फोटो.

जन धन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

jan dhan yojana account opening online

 • सर्वात प्रथम तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
 • त्यानंतर तुमच्या समोर एक होम पेज ओपन होईल.
 • त्यानंतर तुम्हाला अकाउंट ओपनिंग फॉर्म हिंदी / अकाऊंट ओपनिंग फॉर्म इंग्लिश असा पर्याय दिसेल.
 • यात दिलेल्या भाषांपैकी आपण कोणतीही भाषा निवडू शकता.
 • त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
 • त्या नवीन पेज वरती तुम्हाला जन धन फॉर्म मिळेल.
 • त्यानंतर हा फॉर्म डाऊनलोड करा आणि वेवस्थित भरून वरती दिलेल्या सर्व कागदपत्रंना जोडून तुमच्या जवळच्या बँकेत सादर करा.

जन धन खात्याची शिल्लक कशी तपासायची

पोर्टल द्वारे
 • सर्वात प्रथम तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • त्यानंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
 • त्या हिम पेज वरती तुम्हाला Know Your Payment यावरती क्लिक करून तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
 • या पेज वरती तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव, तुमचे खाते क्रमांक भरावा लागेल. त्यानंतर तिथे दिलेला कॅप्चं कोड भरावा लागेल.
 • त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती OTP पाठवा वरती क्लिक करा. तुम्हाला एक OTP येईल तो OTP टाकून तुम्ही तुमच्या खात्याची शिल्लक तपासू शकता.

मिस कॉल द्वारे

 • जर तुमचे जन धन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर तुम्ही 8004253800 अथवा 1800112211 वरती मिस कॉल करून तुमच्या खात्यातील शिल्लक तपासू शकता
 • परंतु तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरून मिस कॉल द्यावा लागेल.
योजनेचे नाव Jan Dhan Yojana
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
स्थितीसक्रिय
उद्देशदेशातील सर्व गरीब नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे
वर्ष2023
श्रेणीआर्थिक केंद्र योजना
द्वारे सुरूप्रधान मंत्री नरेंद्र मोदी
योजनेची सुरुवात 28 ऑगस्ट2014
विभागभारतीय वित्त विभाग
लाभार्थीदेशातील सर्व गरीब नागरिक
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.