Maha Sharad Portal | महा शरद पोर्टल योजना; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Maha Sharad Portal महा शरद पोर्टल योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, शासन सामान्य आणि गोर गरीब नागरिकांसाठी तसेच वृध्द, विधवा महिला, अपंग ,निराधार नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित असते. त्या योजनेअंतर्गत त्या नागरिकांना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत होते अशीच एक योजना सरकारने राबवली आहे Maha Sharad Portal महा शरद पोर्टल योजना, या योजनेअंतर्गत अपंग नागरिकांना लाभ मिळणार आहे. या योजनेतून कसा लाभ घेयचा, या योजनेची पात्रता काय, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कसा करायचा या बद्दल आपण माहिती या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून सविस्तर माहिती जाणून घ्यावी.

महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील अपंग, अंध, निराधार, वृध्द, अनाथ बालके, विधवा महिला अशा स्थरावरील सर्व व्यक्तींचे जीवन सक्षम करण्यासाठी त्यांना उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार अशा योजनांमधून आर्थिक सहाय्य करीत असते. महाराष्ट्र राज्य सरकारच्या या अशा योजनांची माहिती बहुतांश अपंगापर्यंत होहचात नाही या मुळे आहे अपंग व्यक्ती या योजनेपासून वंचित राहतात. या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. दिव्यांग व्यक्तींना केवळ आपल्या नावाची महा शरद पोर्टल वरती नोंदणी करायची आहे. आणि त्यांचे ज्या प्रकारचे अपंगत्व आहे त्या प्रकारची मदत किंवा साहित्य शासनाकडून दिले जाणार आहे.

अपंग पेन्शन योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या पोर्टलद्वारे वेगवेगळ्या भागातील अपंग नागरिक त्यांच्या अपंगत्व प्रमाणे या पोर्टल वरती नोंदणी सोप्या पद्धतीने करू शकतील. तसेच या पोर्टल द्वारे राज्यातील दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या अपंगत्व नुसार लागणाऱ्या मदातींसाठी राज्यातील दानशूर देणगी देणारे यांचा शोध घेऊ शकतात. त्यामुळे या पोर्टल द्वारे बऱ्याच दिव्यांग व्यक्तींनी आपली नोंदणी केली आहे. त्यासोबतच देणगी दार सुधा या पोर्टल वरती आपल्या नावाची नोंदणी केली आहे.

Maha Sharad Portal Purpose योजनेचा उद्देश

 • दिव्यांग नागरिकांना जास्तीत जास्त या पोर्टल मधे नोंदणी करने.
 • या पोर्टल अंतर्गत दिव्यांग नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे.
 • या पोर्टल द्वारे दाते दिव्यांग नागरिकांना मदत करतात.
 • या पोर्टल मध्ये नोंदणी केल्यानंतर सरकार कडून आर्थिक मदत केली जाते.
 • दिव्यांग व्यक्तींना या पोर्टल अंतर्गत स्वावलंबी बनवणे.
 • या पोर्टल मध्ये नोंदणी केल्या नंतर दिव्यांग नागरिकांना इतर कोणत्याही व्यक्तींवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

Maha Sharad Portal Features योजनेची वैशिष्ट्ये

 • या पोर्टलच्या माध्यमातून सरकार दिव्यांग नागरिकांना आर्थिक साहाय्य करेल जेणेकरून ते नागरिक स्वावलंबी होतील.
 • महाराष्ट्र दिव्यांग नागरिकांसाठी या पोर्टल ची सुरुवात करण्यात आली आहे.
 • महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती या पोर्टल द्वारे दिली जाईल.
 • दिव्यांग नागरिकांची स्थिती आणि जागरूकता या पोर्टल द्वारे समजू शकते.
 • या पोर्टल वरती नोंदणी करणे फ्री आहे.
 • देणगीदार या पोर्टल द्वारे नोंदणी करू शकतात व त्यांनी केल्याली मदत दिव्यांग नागरिकांपर्यंत पोहचू शकते.
 • राज्यातील सर्व अपंग नागरिकांनी या पोर्टल मध्ये नोंदणी करून येणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.

महा शरद पोर्टल द्वारे नोंदणी करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.

Maha Sharad Portal Documents

 • आधारकार्ड
 • पॅनकार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • मतदान कार्ड
 • अपंग असल्याचे प्रमाणपत्र
 • पात्याचा पुरावा
 • जन्म प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे अनिवार्य आहे.

Maha Sharad Portal online registration या पोर्टल द्वारे नोंदणी करण्याची पद्धत.

 • सर्वात प्रथम तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
Maha Sharad Portal
 • त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईट चे होम पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला दिव्यांग नोंदणी वरती क्लिक करावे लागेल.
Maha Sharad Portal
 • त्यानंतर तुमच्या समोर नोंदणी फॉर्म उपलब्ध होईल.
 • या नोंदणी मध्ये सर्व माहिती भरावी लागेल.
 • सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती एक OTP येईल, तो OTP टाकून तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल.
 • या नंतर तुमचे किती प्रमाणात अपंगत्व आहे किंवा अपंगांचे स्वरूप कोणते आहे, ते समोरील प्रयायापैके आपले स्वरूप निवडून टिक करावे. आता तुम्हाला तुमचा UDID क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र 150 kb आकारामध्ये अपलोड करावे.
 • यानंतर तुम्हाला खाते कोणामार्फत सुरू केले या संबंधी पर्याय निवडावे लागेल.
 • वरील सर्व माहिती भरल्यानंतर तपासून रजिस्टर या बटणावर क्लिक करावे.
 • अशाप्रकारे आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेचे नाव Maha Sharad Portal
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
राज्य महाराष्ट्र राज्य
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील दिव्यांग नागरिक
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य
उद्देशया पोर्टल द्वारे नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे.
योजनेची सुरुवात 2020
द्वारे सुरूमहाराष्ट्र राज्य सरकार
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.