MahaDBT Biyane Anudan | बियाणे, खत, औषधे यासाठी मिळणार अनुदान.

MahaDBT Biyane Anudan Yojna : नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपली योजना या मराठी साईट वरती आज आपण पाहणार आहोत MahaDBT Biyane Anudan Yojna माहिती चला तर मग जाणून घेऊया, शेतकऱ्यांसाठी आनंदाची, शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे इत्यादी खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे. आज या लेखात आपण पाहणार आहोत या योजनेचा लाभ कसा मिळणार, या योजनेसाठी कोण कोणते शेतकरी पात्र असणार, किती टक्के अनुदान शासन लाभार्थ्याला वाटप करणार, बियाणे अनुदान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती, या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा या बद्दल आपण संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती जाणून घ्यावी चला तर मग जाणून घेऊया.

अधिकृत संकेतस्थळ

महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबवत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. सर्व प्रोसेस ही ऑनलाईन असते तसेच शेतकऱ्यांना महादिबिटी शेतकरी पोर्टल (राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजना) अंतर्गत बियाणे सुधा दिली जातात. किंवा बियानासाठी अनुदान दिले जाते.

MahaDBT Biyane Anudan Yojna

शेतकऱ्यांना बियाणे हवे “MahaDBT Biyane Anudan” असल्यास महाडीबीटी पोर्टल वर https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/ अर्ज करणे गरजेचे आहे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे 1) आधारकार्ड झेरॉक्स 2) बँक खाते पासबुक झेरॉक्स 3) शेत जमीन 7/12, 8अ उतारा इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा

बियाणे अनुदान योजना 2023 पिकांचे नाव

MahaDBT Biyane Anudan Yojna 2023 Corp Name
 • मग
 • कापूस
 • तूर
 • बाजरी
 • मका
 • वाटाने
 • उडीद
 • सोयाबीन
 • इत्यादी पिके सुधा आहेत.

बियाणे अनुदान योजनाचा जुना अर्ज असेल तर रद्द कसा करावा

 • मित्रानो नवीन अर्ज करण्यापूर्वी जर आपला जुना अर्ज असेल तर तो जुना अर्ज आधी रद्द करून घ्यावा.
 • जुना अर्ज रद्द करण्यासाठी अर्ज केल्याला बाबी हा पर्याय निवडा.
 • तिथे तूम्ही जेवढे अर्ज केले असतील ते तिथे दिसतील.
 • मग आपल्याला आपला जुना अर्ज त्या लिस्ट मध्ये दिसेल
 • त्या अर्जावर गेल्यानंतर तुम्हाला त्याच्या समोर रद्द करा असा पर्याय दिसेल.
 • त्या पार्याय वरती क्लिक करून तुम्ही तो जुना अर्ज रद्द करू शकता.
 • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती एक टेक्स्ट मेसेज येईल
 • अशा प्रकारए तुमचा जुना अर्ज रद्द होईल.
बियाणे अनुदान योजना अंतर्गत अनुदान किती मिळणार?

केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत खालील अनुदान दिले जाणार आहे.

 • पीक प्रात्यक्षिक करिता – 100% अनुदान
 • प्रमाणित बियाणे करिता – 50% अनुदान

बियाणे अनुदान योजना 2023

शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा अभियान योजने अंतर्गत बियानांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून इच्छुक शेतकरी भात, मुग, तुर, उडीद, बाजरी, मका, सोयाबीन इत्यादी बियनांसाठी ओनलोने अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी शासनाने महादिबी टी पोर्टल वरती शेतकरी योजना या पर्याया मध्ये बियाणे हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तिथून शेतकऱ्यांना बियनासाठी अर्ज करता येणार आहे “Biyane Anudan Yojna 2023”

शेतकरी पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करू शकतात, किंवा जवळचे आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र ऑनलाईन सुविधा केंद्र यांच्या मदतीने शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

MahaDBT Biyane Anudan Yojna Documents बियाणे अनुदान 2023 करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे

 • सातबारा उतारा
 • 8 अ उतारा
 • हमी पत्र
 • अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे असाल तर वैध जात प्रमाणपत्र
 • पूर्व संमती पत्र

अर्ज कसा करायचा? How To Apply For Biyane Anudan Yojana?

mahadbt login

शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला बियाणे अनुदान योजने अंतर्गत बियाणे मिळवण्यासाठी अर्ज करायचा असेल तर खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.

१) सर्व प्रथम महाराष्ट्र शासनाची महाडीबीटी फर्मर अधिकृत वेबसाइट तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटर मध्ये ओपन करा.

MahaDBT Biyane Anudan

२) आत या वेबसाइट वर शेतकरी म्हणून मला नाही करा त्या नंतर आधार ओटी पी क्या माध्यमातून किंवा युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

३) आता तुम्ही प्रोफाइल 100% पूर्ण भरा शेत जमिनीची माहिती भरा तसेच पिकांची माहिती उपलब्ध असेल तर टाका.

MahaDBT Biyane Anudan

४) आता तुम्हाला बी बियाणे खते औषधे या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

५) आता तुमच्या समोर बियाणे अनुदान योजनेचा अर्ज ओपन झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला कोणता बियाना पाहिजे ते निवडून घ्या.

MahaDBT Biyane Anudan

६) तुम्हाला हवे असेल बियाणे जीवन तसेच किती बियाणे पाहिजे ही सर्व माहिती भरून तुमचा अर्ज समाविष्ट करा त्या नंतर अर्ज सदर करा, आणि पेमेंट करून झाल्या नंतर तुम्हाला अर्ज सबमिट झाल्याचा एस एम एस येईल.

बियाणे अनुदान योजना 2023 ऑनलाईन फी MahaDBT Biyane Anudan Online Fees

 • योजनेचा अर्ज करतेवेळी किंवा अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाईन फीस भरावी लागते.
 • अर्जाची ऑनलाईन फी आहे 23.60 रुपये एवढी.
 • ही फी ची रक्कम नवीन अर्ज करणाऱ्यांकडून घेतली जाते.
 • जर कोणी याआधी या पोर्टल वरती अर्ज केला असेल तर पुन्हा फी घेतली जाणार नाही
 • तुम्ही सरळ अर्ज करू शकता

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा