mahajob | महा जॉब पोर्टल 2023; बेरोजगारांना मिळणार रोजगाराची संधी!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत mahajob महा जॉब पोर्टल बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित असते mahajob बरेच तरुण बेरोजगार आहेत त्यांच्याकडे कौशल्य, डिग्री, शिक्षण असून देखील त्यांना नोकरी मिळत नाही. आणि अनेक तरुणांना तर सरकारी नोकरी च्या संधी कधी येतात आणि कधी जातात हे देखील काळात नाही. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने बेरोजगारांसाठी maha job portal चालविण्यात येत आहे. यामध्ये नौकरी संदर्भात अनेक अपडेट येत राहतात. यामध्ये ठी तुमच्या कौशल्यावर आणि शिक्षणावर आलेली नोकरी निवडू शकतात. याकरिता तुम्हाला महा जॉब पोर्टल वरती तुमची नोंदणी करणे बंधनकारक आहे.

mahajob

राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार, नोकरी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत आउद्योगिक क्षेत्रातील कंपन्याना लागणारे कुशल कामगारांना संधी मिळते. त्यासोबतच महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील नोकरिंचा आढावा तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे. त्याबद्दल आम्ही सर्व माहिती खाली दिलेली आहे आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी.

उद्योजकांना नेहमी कुशल कामगारांची कमतरता भासत असते. ग्रामीण भागातील व शहरी भागातील कुशल किंवा अकुशल कामगारांना त्यांच्या कौशल्य प्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक नागरिकांना सहज रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना रोजगार सुलभतेने शोधता यावा व उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी कौशल्यपूर्ण कामगार उपलब्ध व्हावेत हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

महाराष्ट्र शासनाने या पोर्टल अंतर्गत 950 ट्रेड आणि 17 वेगवेगळ्या क्षेत्रांचा समावेश केला आहे. महा जॉब पोर्टल हे रोजगार शोधणाऱ्या नागरिकांना रोजगाराची हमी देत नही परंतु महा जॉब पोर्टल वरती रोजगार शोधणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देते. जेणेकरून त्यांना स्थानिक पातळीवर त्यांच्या कौशल्य आणि अनुभवाप्रमाणे नोकरी शोधता यावी. यामुळे कोणत्याही क्षेत्रात कौशल्य असलेले नागरिक त्यांच्या स्थानिक क्षेत्रांसाठी अर्ज करू शकतात.

mahajob purpose या पोर्टलचे उद्दीष्ट

 • या पोर्टल अंतर्गत रोजगार शोधणारे आणि रोजगार देणारे यांच्यातील दुरावा कमी होईल.
 • या पोर्टल द्वारे नागरिकांना कोणत्याही अडचणी शिवाय कामगारांना भरती करण्यास मदत होईल.
 • महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील नागरिकांना त्यांना अवगत असलेल्या कौशल्य नुसार रोजगार उपलब्ध होईल.
 • राज्यातील उद्योजकांना स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळाची कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करण्यासाठी हे पोर्टल सहाय्य करेल.
 • महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाने 16000/- कोटी रुपये गुंतवणूकीच्या उद्देशाने 12 समंज्यास करणार केले आहेत.
 • राजयातील उद्योग 80 टक्के रोजगार स्थानिक नागरिकांना देतील अशी महाराष्ट्र सरकारची अपेक्षा आहे.
 • नवीन उद्योजकांना महाराष्ट्र राज्यामध्ये गुंतवणूक करणे शक्य व्हावे व औद्योगिक युनिट उभारण्यासाठी आवश्यक ते सहाय्य महाराष्ट्र सरकार करणार आहे.

maha job portal benefits या पोर्टलचे लाभ

 • महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य मंत्री यांनी 6 जुलै 2020 रोजी अधिकृत पने हे पोर्टल सुरू केले आहे.
 • या पोर्टल वरती निकाती शोधणारे आणि उद्योजक असे दोघेही नोंदणी करू शकतात.
 • माहिती नुसार महा जॉब च्या उद्घाटन दिवशीच 13,300 रोजगार शोधणे व 143 उद्योजकांनी नोंदणी केली आहे.
 • हे पोर्टल म्हणजे रोजगार शोधणारे नागरिक आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक यांना जोडणारे आहे.
 • महा जॉब पोर्टल म्हणजे रोजगार शोधणाऱ्या तरुणांना त्यांच्या कौशल्य प्रमाणे आणि अनुभवा प्रमाणे रोजगार उपलब्ध करून देणारे प्रभावी माध्यम आहे.

महा जॉब पोर्टल रोजगार क्षेत्रांची यादी

Maha job portal list
 • परिधान
 • समान
 • कापड आणि हातमाग
 • पेंट आणि कोटींग
 • पॉवर
 • लोखंड पोलाद
 • लेदर
 • इंजिनियरिंग
 • ऑटोमोबाईल
 • लॉजिस्टिक्स
 • प्रोडक्शन
 • जीव विज्ञान
 • IT – ITES
 • इलेक्ट्रॉनिक अँड हार्डवेअर
 • एरोस्पेस अँड अव्हीशन
 • फुडप्रोससिंग
 • इस्तुमेंशन, ऑटोमेशन, सर्वीलांस अँड संमप्रेशन

maha job portal documents महा जॉब पोर्टल अर्ज किंवा नोंदणी करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड
 • पॅनकार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • ईमेल आयडी
 • पासपोर्ट आकाराचे फोटो.
 • शैक्षणिक पात्रता व तपशील.
 • कौशल्य प्रमाणपत्र
 • दहावी उत्तीर्ण मार्क शीट
 • बारावी उत्तीर्ण मार्क शीट
 • पदवी
 • पदव्युत्तर प्रमाणपत्र
 • कोणतेही शैक्षणिक पात्रता असल्यास प्रमाणपत्र
 • महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असल्याचा दाखला
 • बायोडेटा

महा जॉब पोर्टल वरती नोंदणी करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज

mahajobs registration
 • महा जॉब पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल
 • शासनाच्या अधिकृत वेबसाईट होम पेज वरती आल्या नंतर तुम्हाला job finder registration हा पर्याय दिसेल ह्या पर्याय वरती तुम्हाला क्लिक करावे लागेल.
mahajob
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्या मध्ये तुम्हाला नोंदणी फॉर्म दिसेल.
mahajob
 • या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरा जसेकी तुमचे नाव
 • रहिवाशी दाखला
 • मोबाईल क्रमांक टाकून गेट OTP वरती क्लिक करा
 • आता मिळालेला OTP टाकून VERIFY OTP करा
 • ईमेल आयडी हा पर्यायी OTP आहे
 • आता तुमचां पासवर्ड सेट करा आणि तो नोट करून ठेवा.
 • त्यानंतर तुमच्या समोर कॅपचा दिसेल तो बॉक्स मध्ये टाकावा लागेल.
 • आता तुम्हाला लॉग इन करण्यासाठी पोर्टलच्या होम पेज वरती जावे लागेल.
 • आता तुम्ही बनवलेला आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा
 • आणि त्या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्या
 • संपूर्ण नाव
 • वर्तमान पत्ता
 • कायमचा पत्ता
 • स्थलांतर करण्याची इच्छा असेल तर
 • अवगत असेलेली भाषा
 • कामाचा अनुभव, कौशल्य तपशील
 • शैक्षणिक तपशील
योजनेचे नाव mahajob
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
वर्ष 2023
लाभार्थीराज्याचे रहिवाशी आणि उद्योजक
राज्यमहाराष्ट्र राज्य
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
उद्देशकुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासाठी
योजनेची सुरुवात 6 जुलै 2020
द्वारे सुरूमहाराष्ट्र सरकार
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा