Mahila Samridhi Yojana Marathi | महिला समृध्दी योजना: महिलांना मिळणार स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी कर्ज; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Mahila Samridhi Yojana Marathi महिला समृध्दी योजना बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Mahila Samridhi Yojana Marathi 2024

मित्रानो, Mahila Samridhi Yojana Marathi महिला समृध्दी योजना ही महिला व्यवसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबवली जात आहे. या योजनेचे महलांच्या जीवनात खूप महत्व आहे.

नारी शक्ती दुत ॲप, आता मिळणार मोबाईल वरती सर्व सरकारी योजनांची माहिती

सध्याच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन काम.करत आहेत. महिलांनी त्यांच्या जीवनात पुढे जावे यासाठी शासनाने अनेक योजना अमलात आणल्या आहेत. जेणेकरून महिला स्वतःचा व्यवसाय सुरु करीत व कुटुंबाचा आर्थिक विकास करतील.

आपल्या देशात कित्येक महिला बचत गटांच्या साहाय्याने आपला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी पुढे आलेले आहेत. परंतु काही महिलांना या सारख्या योजना माहित नसतात, त्यामुळेच अशा महिलांना या सारख्या योजनाचा लाभ घेता येत नाही.

माहिला समृध्दी योजना कर्ज योजनेचे स्वरूप

Mahila Samridhi Yojana Marathi

 • महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी सरकार कडून 5 ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा वयाजदर हा 4% असा आहे.
 • कर्ज परतफेडीचा कालावधी हा 3 वर्ष राहील.
 • या योजनेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील महिलांना कर्ज पुरवठा करण्यात येतो
 • या योजनेअंतर्गत महिलांना 95% कर्ज राष्ट्रीय मंडळाकडून व 5% कर्ज राज्य मंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील महिला लाभ घेऊ शकतात.
 • प्रकल्प मर्यादा 5 लाख रु. पर्यंत बचत गटातील सभासदांना प्रत्येकी 25 हजार रुपये आहे.
Mahila Samridhi Yojana Marathi

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

महिला समृध्दी योजना पात्रता

Mahila Samridhi Yojana Marathi 2024

 • या योजनेचे लाभार्थी हे अनुसूचित जाती किंवा मागासवर्गीय असेल पाहिजे.
 • लाभार्थी दारिदर्यरेषेखालील असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थ्यांना कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसवा.
 • महिला लाभार्थ्यांचे वय किमान 18 ते 50 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे.
 • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण 98 हजार व शहरी 1 लाख 20 हजार रुपये असणे आवश्यक आहे.
 • बचत गट स्थापन होऊन किमान 2 वर्षाचा कालावधी झाला पाहिजे.
 • अर्जदार हा बचत गटातील सदस्य असणे आवश्यक आहे.

महिला समृध्दी योजना नियम व अटी

Mahila Samridhi Yojana Terms And Conditions

 • या योजनेअंतर्गत महिलांना 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत फक्त महिलांना लाभ दिला जाईल.
 • मिळालेल्या कर्जाचा उपयोग हा 4 महिन्यांच्या आत करणे आवश्यक आहे.
 • मिळालेल्या कर्जाची रक्कम ही 3 वर्षाच्या आत परतफेड करावी लागेल.
 • अशा प्रकारचे आर्थिक सहाय्य हे बचत गटांना केवळ एक वेळेस देण्यात येईल.

महिला समृध्दी योजना आवश्यक कागदपत्रे

Mahila Samridhi Yojana Documents

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • बँक खाते पासबुक
 • जातीचे प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचे फोटो.
 • ईमेल आयडी
 • मोबाईल क्रमांक
 • रहिवाशी दाखला
 • उत्पन्न दाखला
 • बचत गटांच्या पॅनकार्ड ची प्रत
 • व्येवसाय करत असलेल्या जागेचा पुरावा.
 • बचत गटाच्या खात्याचे पासबुक प्रत

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

महिला समृध्दी योजना अर्ज करण्याची पद्धत

Mahila Samridhi Scheme Registration Process

 • अर्जदाराला आपल्या जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन अर्ज घ्यावा लागेल.
 • अर्जात असलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घेयची आहे.
 • त्या अर्जातील महीती योग्यरीत्या भरून घ्यावी.
 • अर्जासोबत वरती दिलेले सर्व कागदपत्रे जोडून घ्यावे.
 • अर्ज व कागदपत्रे जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जमा करावी.
 • व त्यांच्या कडून अर्ज जमा केल्याची पोच पावती घ्यायची आहे.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा