Maratha Kunbi Caste Certificate 2024 | मराठा कुणबी जात प्रमाणपत्र: असे बनवा तुमचे कुणबी जात प्रमाणपत्र!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Maratha Kunbi Caste Certificate 2024 मराठा कुणबी जात प्रमाणपत्र 2024 बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या करिता मोठे आंदोलन उभे केले आहे. Maratha Kunbi Caste Certificate 2024 जारांगे पाटील यांनी 2 नोव्हेंबर ला शासनाच्या आश्वासनं नंतर आपले उपोषण स्थगित केले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवा व सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. सुरुवातीला फक्त मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी होती, परंतु आता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी आहे.

मराठा समाजातील तरुणांना मिळणार व्यवसाय करण्यासाठी 15 लाखांचे बिनव्याजी कर्ज, येथे क्लिक करा

या मागणीला मराठा समाजाला यश प्राप्त होत असलेले दिसून येत आहे. कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, महसुलाचे पुरावे, शैक्षणिक पुरावे, निजामकालीन संस्थांनी दिलेल्या सनदी, निजाम कालीन झालेले करार, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत त्यासोबतच तपासणी अंती पात्र नागरिकांना कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अधेक्षते खाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढवण्यात आली आहे. असे या नवीन GR मध्ये म्हांटल आहे.

कुंनबी जात प्रमाणपत्र नेमके कसे काढता येणार?

Maratha Kunbi Caste Certificate 2024

  • कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढता येणार यामध्ये अजूनही संभ्रम आहे.
  • मित्रानो कुणबी जात प्रमाणपत्र बनवण्यासाठी 13 ऑक्टोंबर 1967 रोजी किंवा त्याआधी जन्म झालेल्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईक म्हणजेच
  • तुमचे वडील,
  • अत्या,
  • चुलते,
  • आजोबा,
  • पणजोबा,
  • वडिलांचे चुलते,
  • वडिलांच्या आत्या,
  • वडिलांचे पणजोबा,
  • खापर पणजोबा,
  • खापर पणजोबा चुलते.
  • यापैकी कुठल्याही एका नातेवायकचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे अनिवार्य आहे.
  • रक्त नातेसंबंधातील प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावरती कुणबी अशी नोंद आहे का ते तपासा.

स्वतंत्र काळात आपल्या गावातील प्रत्येक नागरिकाच्या जन्म व मृत्यू ची नोंद कोतवाल वही किंवा गाव नमुना नं .14 मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी प्रत्येक महिन्याला तहसील कार्यालय मध्ये पाठवल्या जात असे. 1 डिसेंबर 1963 पासून कोतवाल हे पद महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले व हे काम ग्राम पंचायतच्या ग्रामसेवक यांच्याकडे देण्यात आले.

आपल्या राकट नातेसंबंधातील नातेवाईकांचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाचा गाव नमुना नं. 14 किंवा कोतवाल वहीची नक्कल याची मागणी करावी. यांचे कुणबी नोंद आहे ते तपासा.

Maratha Kunbi Caste Certificate 2024

  • आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंद 6ड नोंदी,
  • जमीन वाटप नोंदी,
  • सात बारा 8 अ,
  • फेरफार,
  • भाडेपट्टी,
  • खरेदीखत,
  • सातबारा अमलात येण्याआधी असणारे क ड ई पत्र सुडपत्र,
  • खासरा पत्रक,
  • हक्कपत्र
  • किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातींचा उल्लेख आहे का?
  • ते शोधावे आणि कागदपत्रे काढून घ्यावी.

जर आपले रक्त नातेसंबंधातील नातेवाईक सरकारी किंवा निमशासकीय सेवेत असल्यास सर्व्हिस बुक च्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाईकांची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा.

रक्त नातेसंबंधातील नातेवाईक यांनी जर अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर, त्यांचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाजकल्याण खात्याच्या छाननी समितीने वैद्य ठरवलेले त्यांचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुधा जातीचा पुरावा म्हणून चालेल.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा