Mofat Driving Prashikshan | मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि लायसेन्स योजना;

Driving training | car driving training | driver schools | driver learning | driving course | driving training in marathi | free driving course | मोटार वाहन परवाना | मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण योजना | Mofat Driving Prashikshan

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत mofat driving prashikshan मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि लायसेन्स योजना बद्दल माहिती. आजच्या या लेखात आपण पाहूया मोफत ड्रायव्हिंग लायसन्स करिता कोणते नागरिक पात्र आहेत, या योजने साठी काय पात्रता पाहिजे, कोणकोणते कागदपत्रे लागतील, अर्ज कसा करावा, या योजनेचा लाभ काय ह्या बद्दल आपण संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती जाणून घ्यावी चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, महाराष्ट्र सरकार राज्यातील सामान्य आणि गरीब नागरिकांसाठी त्यांच्या हिताच्या अनेक प्रकारच्या योजना राबवित असते. राज्यातील गरीब नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा या हेतूने महाराष्ट्र सरकार योजना राबवित असते. त्यातीलच एक योजना म्हणजे मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण योजना mofat driving prashikshan या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द, इतर मागासवर्गीय प्रवर्ग व विमाप्र प्रवर्गातील नागरिकांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण दिले जाणार आहे.

car driving training

आपण पाहतच आहात राजयात मोटार वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, वाहतूक रस्ते व नागरिकांचा पर्यटन कडे वाढणारा कल पाहता वाहन व्यवसाय मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. त्याबरोबरच मागासवर्गीय प्रवर्गातील तरुणांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असून बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्यामुळे मोटार वाहन परीक्षण घेण्यासाठी लागणारी फी भरण्यासाठी पैसे नसतात. वरील सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या करिता या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

mofat driving prashikshan मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षणाचे वैशिष्ठे

 • महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील तरुणांचे जीवनमान सुधारण्यासाठी
 • मागासवर्गीय प्रवर्गातील तरुणांनाचां सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी व त्यांना सशक्त व आत्मनिर्भर होण्यासाठी सदर योजना महत्वाची आहे.
 • या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक कल्याण विभागाद्वारे केली आहे
 • या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगारांची संख्या कमी होईल.
 • लाभार्थ्याला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची समस्या यावी नाही म्हणून अर्ज प्रक्रिया सोप्या पद्धतीने ठेवली आहे.
 • सदर योजना राज्यातील सर्व जिल्ह्यामधे राबविण्यात येत आहे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण योजनेचे उद्देश
car driving training purpose
 • राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील तरुणांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • राज्यातील तरुणांना स्वतःचा पायावर उभे करणे
 • राज्यातील वाढती बेरोजगारी कमी करणे
 • राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
 • महाराष्ट्र राज्यातील तरुणांना आत्मनिर व सशक्त बनवणे.
 • मागासवर्गीय तरुणांना मोटार वाहन चे प्रशिक्षण देउन त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
 • मागासवर्गीय प्रवर्गातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देणे.

मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण योजनेचा लाभ

driver schools
 • या योजनेअंतर्गत राज्यातील वाढती बेरोजगारी कमी होईल
 • या योजनेअंतर्गत राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील तरुण सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील तरुणांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील तरुणांचे जीवनमान सुधारेल.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील तरुणांनाचा सामाजिक व आर्थिक विकास होल्यास मदत होईल.

Mofat Driving Prashikshan beneficiary मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी

 • मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द, इतर मागासवर्गीय प्रवर्ग व वीमाप्र प्रवर्गातील तरुण हे अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण योजनेचे लाभाचे स्वरूप

driver learning
 • लाभार्थ्यास खासगी ड्रायव्हिंग स्कूल मध्ये प्रशिक्षण दिले जाते.
 • प्रत्येक सत्रात 50 लाभार्थ्यांना प्रवेश देण्यात येते त्यासोबतच वाहकाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
 • दिलेले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत परीक्षा घेऊन मोफत वाहन चालवण्याचा परवाना दिला जातो. व वाहकास प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बॅच दिला जातो.
 • प्रशिक्षण पूर्ण होऊन उमेदवारांना वाहन परवाना आणि बॅच मिळाल्यानंतर सरकारने विहित केलेल्या शुल्काची प्रतिपूर्ती प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस अड केली जाते.
 • प्रशिक्षण कालावधी मध्ये जिल्हा पर्यालय ते प्रशिक्षण केंद्र पर्यंत येण्या जाण्याचे भाडे, छायाचित्र, आरोग्य तपासणी, चालकाचा काच्चा व पक्का परवाना, वाहकाचा परवाना व बॅच व जेवणाची सोय इत्यादी प्रशिक्षण संस्थेमार्फत केली जाते.
 • प्रशिक्षण केंद्राच्या मुख्यालयी राहणाऱ्या स्थानिक प्रशिक्षणार्थी वसतिगृहात राहत नसल्यास मोटार वाहन चालक प्रशिक्षणार्थीस 300/- रुपये व वाहक प्रशिक्षणार्थीस 150/- रुपये या प्रमाणे प्रशिक्षण काळात प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्या वेतन देण्यात येते.

आता सर्वांनाच मिळणार उद्योग करण्यासाठी कर्ज पहा येथे

Mofat Driving Prashikshan terms and conditions मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण योजनेच्या अटी

 • या योजनेचा लाभ घेणारा उमेदवार हा मोटार परिवहन अधिनियम तरतुदी नुसार वयोमर्यादा, शैक्षणिक अहार्ता, जातीचा दाखला, शारीरिक पात्रता इत्यादी बाबींची पूर्तता करणारा असावा.
 • या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील नागरिकांचा घेता येईल
 • महाराष्ट्राच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • अर्जदार हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौध्द, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असावा
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराकडे हलके मोटार वाहन चालक परवाना असल्यास अशा अर्जदाराला जद वाहन परवान्यासाठी पात्र राहणार नाही.
 • अर्जदाराने या पूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • हलके मोटार वाहन परवाना 10 टक्के महिलांसाठी जागा राखीव असतील, जर महिलांचे अर्ज कमी आल्यास त्या जागा पुरुषांसाठी भरण्यात येतील.
 • अर्जदाराकडे जातीचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
 • अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख पेक्षा जास्त नसावे, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार हा किमान 8 वी उत्तीर्ण असावा आणि बेरोजगार असावा.
 • ज्या विद्यार्थ्यांना जड वाहन परवाना प्रशिक्षण घेयचे आहे, त्यांच्याकडे हलके मोटार वाहन परवाना 1 वर्ष पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्ष हलक्या वाहन परवान्यासाठी 20 वर्ष जड वाहन परवान्यासाठी आणि वयाची कमाल मर्यादा 35 वर्ष राहील.

मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण योजनेकरीता लागणारी आवश्यक कागदपत्रे

Mofat Driving Prashikshan documents

 • आधारकार्ड
 • राशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • मेडिकल प्रमाणपत्र
 • जातीचा दाखला
 • जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
 • महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी दाखला
 • शिक्षण प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण योजनेचा अर्ज करण्याची पद्धत driving classes
 • अर्जदाराला सर्वात प्रथम त्यांच्या जवळच्या संबंधित जिल्ह्याचे विषेश जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा.
 • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून व कागदपत्रे जोडून हा अर्ज जमा करावा.
 • संबंधित योजनेचंए अधिकारी या अर्जाची पडताळणी करून अर्जदारास काही दिवसात कलावतील.
योजनेचे नाव Mofat Driving Prashikshan मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण
वाहन चालक प्रशिक्षण अर्ज PDFयेथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
लाभमोफत चलाक वाहक प्रशिक्षण
सुरुवात1972
राज्यमहाराष्ट्र राज्य
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
लाभार्थीराज्यातील गरीब कुटुंबातील तरुण
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा