Nari Shakti Dut App | नारी शक्ती दुत ॲप लाँच: सरकारी योजनांचा लाभ आता तुमच्या हाती; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Nari Shakti Dut App नारी शक्ती दुत ॲप बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Nari Shakti Dut App In Marathi

मित्रानो, महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाने नमो शसक्तिकरणाला चालना देण्या करिता “Nari Shakti Dut App” नारी शक्ती दुत ॲप च्या अंतर्गत एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी कल नवी मुंबई येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात नारी शक्ती दुत ॲप लॉन्च केले आहे.

शासनाच्या या 3 योजनांमधून मिळणार तुम्हाला आर्थिक सहाय्य, येथे क्लिक करा

या ॲप क्या साहाय्याने महिलांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळणार आहे. नारी शक्ती दुत ॲप च्या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना महिलांना माहिती घेणे व त्यांची मदत करणे शक्य होणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरजू महिलांना शासकीय योजनांचा लाभ सहज मिळवा हा आहे व या ॲप चे डिझाईन अश्या प्रकारे केले आहे.

महिलांसाठी सरकारी योजनेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने नारी शक्ती दुत ॲप विकसित केले आहे. बहुतांश पात्र गरजू नागरिकांपर्यंत सरकारी योजनांची माहिती पोहचत नाही. त्यांना मिळणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यास अडचणीचा सामना करावा लागतो. या अनुषंगाने हे ॲप शासन आणि लाभार्थी नागरिक यांच्या मधील एक महत्वाचा दुवा म्हणून काम करते. आणि या सोबतच गरजू लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळणे सुलभ होते.

Nari Shakti Dut App 2024

नारी शक्ती दुत ॲपच्या प्रक्रियेतील 5 महत्वाचे टप्पे

 • नागरिकांकडून लाभार्थ्यांची ओळख करून त्यांची माहिती नारी शक्ती दुत ॲप द्वारे सदर केली जाते.
 • सदर माहिती जनकल्याण कक्षाला दिली जाते.
 • जिल्हा जनकल्याण कक्ष लाभार्थ्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधते.
 • पात्रता तपासणे आणि त्यांना लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत केली जाते.
 • नारी शक्ती दुताना मिळालेल्या लभाबद्दल माहिती मिळते.
Nari Shakti Dut App
 • Nari Shakti Dut App हे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेले आहे.
 • तटकरेंनी त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना या मोबाईल ॲप वरती काम करण्याचे आदेश दिले आहे.
 • यामुळे महिलांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अतिशय सोपे होते.
 • महाराष्ट्राच्या नमो महीला शसक्तिकरण अभियान अंतर्गत पंत प्रधान यांच्या हस्ते ॲप लाँच करण्यात आले आहे.

Nari Shakti Dut App नारी शक्ती दुत ॲप हे वापरण्यासाठी सोपे आणि सुलभ बनवण्यात आले आहे. जेणेकरून ॲप वापरणे महिला किंवा इतर वयोगटातील वापरणे सोपे होईल. सध्या हे ॲप प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे. नागरिक बचत गट आय ॲपचा वापर करून त्यांच्या परिसरातील सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात. या ॲप मध्ये विविध सरकारी योजना, त्यांच्या पात्रतेचे निकष आणि ते देत असलेल्या लभांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्यासोबतच गरजू महिलांना प्रभावीपणे मार्गदर्शन करण्यासाठी नागरिकांना सक्षम करते.

सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना नारी शक्ती दुत ॲपवरती पोर्टल अक्सेस असेल. ज्यामध्ये ते नागरिकांनी मदत केलेल्या गरजू महिलांची माहिती पाहू शकतात, संपर्क साधू शकतात आणि त्यांना मदत पुरविण्यासाठी काम करू शकतात. ॲप वापरकर्ते त्यांच्या संबंधित प्रकरणाची प्रोग्रेस ट्रॅक करू शकतात. त्यासोबतच कामातील पारदर्शकता देखील तपासली जाऊ शकते.

नारी शक्ती दुत ॲप चे फायदे

 • गरजू महिलांना असणाऱ्या विविध सरकारी योजनांची मोबाईल द्वारे मिळेल.
 • यासोबतच गरजू महिलांना मदत मिळेल.
 • गरजू महिलांचे सशक्तीकरण होईल.

नारी शक्ती दुत ॲपचा वापर कसा करावा?

 • आपल्या मोबाईलच्या गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअर वरून नारी शक्ती दुत ॲप डाऊनलोड करून घ्या.
 • आता तुम्हला ॲप मध्ये नोंदणी करावी लागेल.
 • त्यामध्ये तुमच्या परिसरातील गरजू महिलांची माहिती द्या.
 • महिलांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्या.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा