New Ration Card Apply | नवीन राशन कार्ड प्रक्रिया: राशन कार्ड बद्दल संपूर्ण माहिती!

Ration Card Information In Marathi | New Ration Card Apply | apply for ration card Maharashtra | new ration card apply online Maharashtra | new ration card online registration marathi | new ration card application status | नवीन राशन कार्ड बनवणे | नवीन राशन कार्ड अर्ज प्रक्रिया | new ration card apply form marathi

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत New Ration Card Apply नवीन राशन कार्ड काढण्याच्या संपूर्ण प्रक्रिया बद्दल माहिती, नवीन राशन कार्ड काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात? या प्रक्रियेसाठी कर्ज करण्याची पद्धत कशी आहे? राशन कार्डांच्या रंगांचा अर्थ काय? राशन धान्यांचा दर किती? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आज आपण या लेखात पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

New Ration Card Apply In Marathi

मित्रानो, या चालू वर्षा मध्ये मोदी सरकारने पूर्ण वर्षभर राशन मोफत देण्याची योजना राबविली आहे New Ration Card Apply. ही योजना डिसेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहे, त्यानंतर पहिल्या दर प्रमाणे नागरिकांना राशन धान्य घ्यावे लागेल. ते दर खालील प्रमाणे आहेत आपण पाहू शकता.

राशन स्वस्त धान्य दुकानातील धान्यांचे दर…

ration card status

धान्यदर
तांदूळ3 रुपये किलो
गहू2 रुपये किलो
तूर डाळ35 रुपये किलो
साखर20 रुपये किलो
उडीद डाळ44 रुपये किलो
रॉकेल24.50 रुपये प्रति लिटर

रेशनकार्ड मध्ये नाव वाढवायचे असेल तर…

New Ration Card Apply

 • शिधापात्रिकेमध्ये नाव वाढविण्या बाबतचा अर्ज. Mera ration
 • लग्नानंतर पत्नीचे नाव शिधा पत्रिकेत वाढवायचे असेल तर त्या करिता सर्वात प्रथम पत्नीच्या माहेरच्या रेशन कार्ड मधून नाव कमी केल्या बाबतचे तहसीलदार किंवा परिमंडळ यांचा दाखला त्यासोबतच लग्न पत्रिका अथवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
 • रेशन कार्ड मध्ये लहान मुलांचे नाव वाढवायचे असेल तर लहान मुलांचा जन्माचा दाखला त्यासोबतच शाळेतील बोनाफाईड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • जर राशन कार्ड मध्ये प्रौढ व्यक्तींचे नाव वाढवायचे असेल तर त्यांच्या आधीच्या रेशन कार्ड मधून नाव कमी केल्या बाबतचे प्रमाणपत्र
ration card status

रेशन कार्ड मधील नाव कमी करायचे असेल तर…

ration card list

 • शिधा पत्रिका मधील नाव कमी करण्या बाबतचा अर्ज. New Ration Card Apply
 • जर मुलीचे लग्नं झाले असल्यास रेशन कार्ड मधील नाव कमी करायचे असेल तर मुलीच्या लग्नाची जोडून मुलीचे नाव कमी करण्याकरिता अर्ज भरावा.
 • जर परिवारातील एखादा व्यक्ती मयत असेल तर त्या व्यक्तीचे मयत प्रमाणपत्र जोडून नाव कमी करण्यासाठी अर्ज करावा.
 • जर संपूर्ण कुटुंब परवागी राहण्या करिता जात असेल तर त्या करिता पहिला मुल कार्ड व नाव कमी करण्यासाठीचां अर्ज दाखल करावा.

निराधार, विधवा, अपंग, वृध्द नागरिकांना मिळणार दर महा पेन्शन येथे क्लिक करा

रेशन कार्डचा रंग कशावरून ठरवला जातो पांढरा, पिवळा किंवा केशरी.

ration card
 • रेशन कार्डचा रंग हा राशन च लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न यांच्यावरून ठरवला जातो.
 • पांढरे राशन कार्ड, केशरी राशन कार्ड आणि पिवळे रेशनकार्ड वार्षिक उत्पन्न मर्यादा ही खालील प्रमाणे आहे.
 • पांढरे राशन कार्ड यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 1 लाख किंवा त्या पेक्षा जास्त असते.
 • केशरी रेशनकार्ड यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा कमाल ही 1 लाख किंवा त्या पेक्षा कमी असते.
 • पिवळे रेशनकार्ड यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 15 हजार रुपयां पर्यंत असते.
 • या वरून रेशन कार्ड चे रंग ठरवले जाते.

नवीन राशन कार्ड करिता अर्ज केल्या नंतर किती दिवसात मिळते?

ration card status

 • जर नवीन राशन कार्ड करिता अर्ज केला असेल तर त्या साठी 1 महिन्याचा कालावधी लागतो.
 • जर नागरिकांनी चालू राशन कार्ड मध्ये नावात बदल किंवा नाव वाढविणे अथवा नाव घटविने असा अर्ज केला असेल तर रेशनकार्ड परत मिळण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी लागतो.
 • दुसऱ्यांदा राशन कार्ड मिळण्या करिता अर्ज केला असेल तर राशन कार्ड मिळण्यासाठी अर्जदाराला 8 दिवसाचा कालावधी लागतो. New Ration Card Apply

नवीन राशन कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

documents for new ration card
 • नवीन राशन कार्ड काढण्यासाठी अर्ज new ration card documents
 • कुटुंबातील ज्येष्ठ स्त्री किंवा पुरुष कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्या नावे अर्ज.
 • अर्जदार कुटुंब प्रमुख यांचे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो व त्या फोटो वरती अर्जदाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा.
 • आधार कार्डची प्रत किंवा आधार नोंदणी केल्याची पावती झेरॉक्स प्रत.
 • आपण नवीन राशन कार्ड करताना आधीच्या राशन कार्ड मधील नाव कमी केल्या बाबतचे प्रमाणपत्र. आणि ते प्रमाणपत्र नसेल तर त्या ठिकाणचे तहसीलदार यांचे नाव नसल्या बाबतचे प्रमाणपत्र.
 • रहिवाशी किंवा पत्त्याच्या अथवा जागेच्या पुराव्यासाठी स्वतःचा राहत्या घराच्या वीजबिल अथवा वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र, जर राहते घर भाड्याने असेल तर घर मालकाचे संमती पत्र व त्यांच्या नावे असलेले वीज बिल देणे अनिवार्य आहे.
दुसऱ्यांदा राशन कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
ration card online
 • राशन कार्डची दुय्यम प्रत मिळविण्या करीता अर्ज second ration Card documents
 • जार तुमचे आधीचे रेशनकार्ड गहाळ झाले असेल किंवा हरवले असेल, आणि तुम्हाला नवीन राशन कार्ड पाहिजे असेल तर त्या करिता लागणारी आवश्यक ती कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
 • राशन कार्ड चालू असल्या बाबतचा राशन दुकानदारांकडून सही व शिक्का असणारे प्रमाणपत्र.
 • राशन कार्ड हरवल्या बाबतचे पोलीस स्टेशन यांचे प्रमाणपत्र.
 • अर्जा सोबत ओळखपत्र पुरावा
 • आधीचे राशन कार्ड खूप जुने झाले असेल किंवा त्या राशन कार्ड वरील अक्षरे पुसत झाले असतील तर साध्या कागदावरील घोषणापत्र अनिवार्य आहे.
 • जर आधीचे रेशन कार्ड जीर्ण झाले असेल तर त्या आधीच्या रेशन कार्ड वरती राशन दुकानदारांची सही व शिक्का असने अनिवार्य आहे.

नवीन राशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

how to apply Online new Ration Card in marathi

 • नवीन राशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • तिथे apply online for ration Card वरती क्लिक करावे लागेल.
 • त्यात तुमच्या परीवराबद्दल विचारलेली सर्व माहिती भरून घ्यावी.
 • त्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 • तुमच्या कडून 5 रुपये ते 45 रुपयांपर्यंत शुल्क आकारला जाऊ शकतो.
 • या नंतर सबमिट या बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर फिल्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची माहिती व अर्ज योग्य असल्यास आपल्याला राशन कार्ड दिले जाईल.
 • अशा प्रकारे तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

राशन दुकानदाराने धान्य न दिल्यास काय करावे?

ration card maharashtra

 • जर तुम्हाला राशन दुकानदार धान्य देण्यास टाळाटाळ करत असेल
 • किंवा राशन कार्ड धारकांना धान्य मिळण्यास अडचण निर्माण होत असेल
 • तर असे नागरिक जिल्हा अन्न व पुरवठा नियंत्रण कार्यालयात किंवा राज्य ग्राहक सेवा केंद्रावर तक्रार करू शकतात.
 • याकरिता शासनाने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत.
 • त्यावरती आपण तक्रार करू शकतात.
 • 1800-180-2087
 • 1800-212-5512
 • तसेच 1967 हे टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.
 • तसेच अनेक राज्य सरकारांनी आपापले स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहे.
योजनेचे नावration card status
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
विभागअन्न नागरी पुरवठा व संरक्षण विभाग
लाभनवीन राशन कार्ड
वर्ष2023
स्थितीसक्रिय
लाभार्थीदेशातील नागरिक
अधिक योजनायेथे क्लिक करा

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा