New Ration Shop 2024 | 233 रेशन दुकाने नव्याने होणार सुरू: इच्छुकांनी करा अर्ज: पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत New Ration Shop 2024 नव्यानं 233 रेशन दुकाने होणार सुरू, आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

New Ration Shop 2024 In Marathi

मित्रानो, New Ration Shop 2024 पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 233 रेशन दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. राशन दुकानांचा परवाना मिळवण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे.

पी एम आवास योजना यादी झाली जाहीर, पहा यादी मध्ये तुमचे नाव

अवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज अडीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधी पुरवठा कार्यालयाच्या शाखेत याबाबत संपूर्ण तपशील व अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याच नुसार अर्जदाराने विहित मुदतीत अर्ज करावे. मुदतीनंतर अर्ज प्राप्त होणाऱ्यांचा विचार केला जाणार नाही. असे डॉ. सीमा होळकर यांनी सांगितले.

गावांची यादी

  • अबेगाव आणि बारामती तालुक्यातील प्रत्येकी 10
  • भोर 7
  • डौंद आणि इंदापूर प्रत्येकी 1.
  • जुन्नर 26
  • पुरंदर 9.
  • हवेली 17
  • मावळ 36
  • खेड 8
  • मुळशी 28
  • शिरूर 12
  • वेल्हे 68
  • अशा 233 दुकानाचा परवाना मंजूर करण्यात येणार आहे.

रेशन दुकान परवाना मंजूर करण्यावबाबत चा जाहीरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात गावांची नावे, अटी व शर्ती आहेत.

स्वस्त धान्य दुकानाचे प्रथाम्याक्रम पहा.

  • ग्राम पंचायत व तत्स्याम स्थानिक स्वराज्य संस्था.
  • नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट
  • महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था
  • संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था अथवा सार्वजनिक न्यास.
  • महिला स्वयंहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था.
New Ration Shop 2024

लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

New Ration Shop Document

  • 1. ग्रामपंचायतचा दुकान मागणी अर्ज, तेरीज पत्रक,
  • ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेबाबत गटविकास अधिकारी यांचा दाखला.
  • 2. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्यसंस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट,
  • महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास यांचे नोंदणी प्रमाणपत्र.
  • 3. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे आर्थिक स्थितीबाबत कागदपत्र जसे बँक पासबुकची छायांकित प्रत व बँकेचे प्रमाणपत्र / बँक स्टेटमेंट.
  • 4. व्यवसाय करावयाच्या जागेचे मालकीबाबत कागदपत्रे, जागा भाड्याची असल्यास भाडेपत्र, घर, टॅक्स पावती, 7/12, जागेचे क्षेत्रफळ, व्यवसाय ठिकाणाचे क्षेत्रफळ चौ.फुटमध्ये.
  • 5. बँकेकडून कर्ज घेतले असल्यास कर्जाचा तपशील व परतफेडीचे प्रमाणपत्र (बँकेचे व कर्जाची नियमित परतफेड चालू असलेबाबत संबंधीत बँकेचे प्रमाणपत्र व कर्जाची परतफेड झाली असल्यास संबंधीत बँकेचे कर्ज पूर्ण फेड केल्याबाबतचे प्रमाणपत्र.
  • 6. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे वार्षिक लेखे व हिशोब सन 2018-19 पासून आजपर्यंत तपासणी केलेल्या संस्थेचा अहवाल.

अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

New Ration Shop 2024

  • 7. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे अध्यक्ष / उपाध्यक्ष / सचिव व सर्व सभासदांची नावे, पूर्ण पत्यासह.
  • 8. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे मूळ व आजचे भागभांडवल व सध्या करीत असलेले व्यवसाय व कार्याची संपूर्ण माहिती .
  • 9. रास्तभाव दुकान परवाना मिळण्याबाबत व व्यवसाय करण्यासाठी संमती दर्शविलेला पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचा ठराव.
  • 10. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास स्वस्त धान्य दुकान स्वतः एकत्रितरित्या चालवतील ,
  • कोणीही इतर व्यक्तीस अथवा संस्थेस चालविण्यास देणार नाही किंवा हस्तांतरीत करणार नाही याबाबत प्रतिज्ञापत्र.
  • 11. भाडे तत्वावर दिल्या गेलेल्या जागेसंबंधी मूळ जागा मालकाचे विधीग्राह्य दस्तऐवज. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे नावे अन्य कोठेही शिधावाटप दुकान कार्यान्वित नसल्याचे रु .100 /- च्या स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र. (सदरची माहिती खोटी असल्याचे भविष्यात निदर्शनास आल्यास नियमाप्रमाणे पढील कारवाई करण्यात येईल)
  • 12. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत रु .100/- च्या स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र.
  • 13. स्वयंसहायता गटाचे सभासद दारिद्र्य रेषेखालील असल्यास शिधापत्रिका / ग्रामसेवकांचे पत्र / नगरपालिकेकडील पत्र..

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा