Pandit Dindayal Gharkul Yojana | पंडित दीनदयाळ उपाध्याय: घरकुल जागा खरेदीसाठी शासन देणार 1 लाख रुपये!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Pandit Dindayal Gharkul Yojana पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना, ज्यांना घरकुल मंजूर आहे परंतु घरकुल बांधण्यासाठी जागा नाहीय अशांना मिळणार जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये, या बद्दल आपण आज या लेख मध्ये माहिती पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

मित्रानो, अशे बरचसे नागरिक आहेत की ज्यांना घरकुल मजूर झाले आहे परंतु त्यांच्याकडे ते बांधण्यासाठी जन उपलब्ध नाहीय, परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. Pandit Dindayal Gharkul Yojana पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी जागा नसणाऱ्या लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात वाढ करून, म्हणजेच याआधी जागा खरेदी करिता 50 देण्यात येत होते परंतु आता त्यात वाढ करून 1 लाख रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे पात्र लाभार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे असे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

शबरी घरकुल योजना अंतर्गत मिळणार 2 लाख रुपये, येथे क्लिक करा

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी भूमिहीनांना मिळणार 1 लाख रुपये अनुदान..!

Pandit Dindayal Land Purchase Scheme In Marathi

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी जागा नसणाऱ्यांना जागा खरेदीसाठी देवयाचे आधी मिळणाऱ्या अनुदानात वाढ करून 50 हजार रुपयांवरून ते 1 लाख रूप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधेक्षतेखली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Pandit Dindayal Gharkul Yojana

घरकुल जागा खरेदी करण्यासाठी मिळणार 1 लाख रुपये…

केंद्र व राज्य शासनाने सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, आदिम आवास योजना, यासोबतच शबरी आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.

 • या सर्व घरकुल योजनेतील लाभार्थी फक्त जागे अभावी घरकुलांचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते.
 • हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली.
 • राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकानामुळे सध्यस्थितीत जग्यांच्या स्थिती पाहता या योजनेअंतर्गत 50 हजार देण्यात येत होते.
 • परंतु या योजनेमध्ये बदल करून लाभार्थ्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य वाढवण्यात आले आहे. व आता ते 1 लाख रुपये केले आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना पात्रता

Pandit Dindayal Gharkul Yojana Eligibility

 • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • लाभार्थ्यांनी या आधी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 • लाभार्थी हा भूमिहीन असणे अनिवार्य आहे.
 • लाभार्थी हा शासकीय सेवेत काम करणारा नसावा.

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अर्ज कुठे करावा?

Pandit Dindayal Gharkul Yojana 2024 Form Apply

 • या योजनेअंतर्गत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क करावा लागेल.
 • पंचायत समिती मध्ये तुम्हाला या बद्दल सविस्तर माहिती देण्यात येईल.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा