PM Awas Yojana | प्रधान मंत्री घरकुल योजना 2023; असा करा ऑनलाईन अर्ज! पहा सविस्तर माहिती:

आपल्या देशाचे प्रधान मंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी 22/06/2015 रोजी PM Awas Yojana प्रधान मंत्री आवास ची सुरुवात केली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब वंचित, बेघर, काच्ची घरी आणि दारिद्र्य रेषेखालील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना स्वतःच्या हक्काची पक्की घरी उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत सरकारने या योजनेचे 2 भाग केले आहेत, 1 ला भाग प्रधान मंत्री आवास योजना शहरी आणि 2 रा भाग प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण असे आहेत. या योजनेअंतर्गत 31/03/2022 पर्यंत देशात चार कोटी पक्की घरी बांधण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता.

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत PM Awas Yojana प्रधान मंत्री आवास योजना बद्दल माहिती. या मध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा, या योजनेकरीता पात्रता काय आहे, या योजनेच्या अटी, या योजनेअंतर्गत लाभ किती मिळणार, या योजनेअंतर्गत लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे या बद्दल आपण सर्व माहिती पाहणार आहोत, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती जाणून घ्यावी.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पक्की घरे बांधण्यासाठी कर्ज दिले जाते व त्या कार्जा वरती सरकारकडून अनुदान ही दिले जाते. ही योजना 1 जून 201त रोजी शहरातील गरिबांसाठी त्यांना परवडणाऱ्या घरांचा प्रचार करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली सरकारी योजना आहे. भारत देशात जमिनीच्या किमती वाढत चालेल्या आहेत, यामुळे परवडणाऱ्या घरांमध्ये लक्षणीय घट झाली आहे

रमाई आवास योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील प्रत्येक नागरिकांना रोटी, कपडा, मकान हे हवे आहे तर रोटी व कपडा या सारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण सक्षम आहे पण माकन म्हणजे स्वतःचे पक्के घर मिळवणे या काळात खूपच कठीण झाले आहे आणि ते प्रत्येकाच्या नशिबी नाहीय. महागाई, गरिबी आणि बेरोजगारी हे याचे प्रमुख कारण आहे. आज आपण जाणून घेऊ की या योजनेअंतर्गत कोणत्या वर्गाला किती कर्ज दिले जाते आणि त्या कर्जा वरती किती अनुदान आहे हे सविस्तर पाहूया.

What Is PM Awas Yojana प्रधान मंत्री आवास योजना काय आहे.

प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचे स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळते. या योजनेअंतर्गत देशातील गरीब वंचित नागरिकांना त्यांचे स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

PM Awas Yojana Purpose प्रधान मंत्री आवास योजना उद्दीष्टे

 • प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAY या योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे देशातील ग्रामीण भागातील गोर गरीब, वंचित, झोपडीत किंवा कच्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना मूलभूत सुविधांसह त्यांच्या हक्काच्या स्वतःचे घरे उपलब्ध करून देणे आहे. त्यामध्ये आणखीन मूलभूत सुविधांचा समावेश आहे जसेकि वीज, पाणी आणि शोचालय

प्रधान मंत्री आवास योजनेबद्दल काही महत्वाच्या 10 गोष्टी

 • या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात म्हणजेच 2016-2019 या काळात 1 कोटी पक्के घरे बांधण्याची उद्दीष्टे होती.
 • दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 2019-2024 या काळात 1.95 कोटी पक्के घरे बांधण्याची लक्ष आहे.
 • या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक गरीब कुटुंबांना पक्के घरे देण्याचा सरकारचा ध्यास आहे.
 • साधारण सपाट भागात 1.20 लाख रुपये तर डोंगराळ भागात 1.30 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत 25 चौरस मीटरची घरे समाविष्ट आहेत. या अगोदर इंदिरा आवास योजने मध्ये ही मर्यादा 20 चौरस मीटर पर्यंत होती.
 • या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते.
 • या योजनेअंतर्गत घर बांधण्याचा कालावधी 114 दिवसांचा आहे तर ती आधी 314 दिवसांचा होता.
 • या योजनेअंतर्गत मिळणार निधी हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीकडून पुरविला जातो. या मध्ये 60 टक्के राज्य सरकार देते तर उर्वरित 40 टक्के केंद्र सरकार देते.
 • सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणनेनुसार लाभार्थी ओळखले जातात.
 • अर्ज करण्यासाठीऑनलाईन आणि ऑफाईनअशा दोन्ही प्रक्रिया उपलब्ध आहेत.
 • भू – टॅगिंग द्वारे गृहनिर्माण योजनेचा मागोवा घेतला जातो. या मुळे होणारा भ्रष्टाचार ही हित नाही.

PM Awas Yojana Eligibility या योजनेअंतर्गत असणारी पात्रता

 • आर्थिक दृष्ट्या गरीब व वंचित कुटुंबांसाठी
 • शहीद संरक्षण कर्मचारी/ निमलष्करी दलांच्या जवानांच्या विधवा आणि श्रमिक.
 • बंधमुक्त कामगार
 • ज्यांच्याकडे पक्के घरे नाहीत
 • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती.

या खालील योजनांचे लाभ प्रधान मंत्री आवास योजनेमध्ये ही मिळतात.

 • सौभाग्य योजना – वीज जोडणी योजना
 • मनरेगा – रोजगारासाठी योजना
 • स्वच्छ भारत योजना – शोचालाय बांधण्यासाठी योजना
 • प्रधान मंत्री उज्ज्वला योजना – गॅस LPG कनेक्शन योजना
 • जल जीवन मिशन योजना – पिण्याच्या पाण्याची योजना

PM Awas Yojana Documents योजनेकरीता लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

 • मतदान कार्ड
 • पॅनकार्ड
 • आधारकार्ड
 • बँक खाते
 • वयाचा दाखला
 • मोबाईल क्रमांक
 • जात प्रमाणपत्र
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • रेशन कार्ड
 • पासपोर्ट आकाराचे फोटो.

PM Awas Yojana Online Apply या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

 • सर्वात प्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
 • होम पेज उघडल्यानंतर तुम्हाला प्रथम नागरिक मूल्यांकनाकडे जावे लागेल.
PM Awas Yojana
 • त्यानंतर सिटू स्लॅम रीडेव्हलपमेंट वर क्लिक करून अर्जदाराची एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
 • त्यानंतर एक पेज ओपन होईल. त्यामधे आधार क्रमांक आणि नाव भरून चेक वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर PMAY अर्ज येईल. त्यात विचलेली सर्व माहिती वेवास्थित रित्या भरावी आणि सेव्ह वरती किल्ल करावे.
 • अशा पद्धतीने प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल
 • तुमच्या कागदपत्रांमध्ये महा त्रुटी आढळल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • जर तुम्ही या अगोदर अशा कोणत्याही घरकुल योजनेचालाभ घेतला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येअनार नाही.

या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

PM Awas Yojana Offline Apply Process

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार ऑफलाईन ही अर्ज करू शकतात. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराला त्यांच्या गावाच्या ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा लागेल. त्या लाभार्थ्यांची ओळख ग्रामसभेत करते. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी दर वर्षी ग्रामसभेने मार्फत जारी केली जाते.

योजनेचे नाव PM Awas Yojana
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
लाभार्थी देशातील गरीब कुटुंबे
विभागगृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
उद्देशदेशातील गरीब वांचीत कुटुंबांना पक्की घरी उपलब्ध करून देणे
योजना सुरुवात22 जून 2015
द्वारे सुरूप्रधान मंत्री नरेंद्र मोदी
योजनेचे भागशहरी व ग्रामीण गृहनिर्माण
योजनेची स्थितीसक्रिय
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन
लाभ पक्क्या घरासाठी आर्थिक सहाय्य
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
वर्ष2023
अधिक योजनायेथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.