pm matru vandana yojana | पी एम मातृ वंदना योजना | महिलांना मिळणार 5 हजार रुपये; असा करा अर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत pm matru vandana yojana प्रधान मंत्री मातृ वंदना योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, आपल्या देशातील महिला पुरुषांच्या बरोबरीने येण्यासाठी सरकार विविध योजना राबवित असते, महिलांच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षा साठी त्यांच्या कल्याणासाठी अनेक अशा लाभदायक योजना सरकार मार्फत राबविण्यात येत असतात. आपल्या देशातील बहुसंख्य गरीब महिलांना स्वतःचा व आपल्या परिवाराचा सांभाळ व उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करावी लागते. अशा महिलांना त्या गर्भवती असताना देखील मोलमजुरी करावी लागते. महिला व त्यांच्या पोटात असणाऱ्या बाळाला पोषक आहार मिळत नाही अशा कारणाने म्हीलावर व त्यांच्या बाळावर विपरीत परिणाम होतो. आणि या सोबतच त्यांच्या पोटात असणाऱ्या बाळाचा मृत्यू होण्याची संभावना ही वाढते. त्याच बरोबर प्रसूती नंतरही स्वतःचा व परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करावी लागते.

pmmvy

कमी पोषणाच्या आहाराच्या कारणाने देशातील बहुसंख्य महिलांवर विपरीत परिणाम होतो, आणि कुपोषित आई कमी वजनाच्या बाळाला जन्म देते. अशा कारणामुळे गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच त्यांना सकस आहार घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्यात आरोग्य सुधारणा करणे व येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि गर्भवती महिला व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे या करिता केंद्र सरकारने pm matru vandana yojana पी एम मातृ वंदना योजना सुरू केली आहे.

pm matru vandana yojana features योजनेचे वैशिष्टे

 • पी एम मातृ वंदना योजनेमध्ये केंद्र सरकार 60 टक्के व राज्य सरकार 40 टक्के सहभाग आहे.
 • या योजनेची सुरुवात 2 जानेवारी 2017 ला केली.
 • सदर योजना केंद्र सरकारच्या महिला व बालविकास आरोग्य विभाग मार्फत राबविण्यात येत आहे.

pm matru vandana yojana purpose योजनेचा उद्देश

 • महिलेच्या गर्भावस्थेत आणि प्रसूती नंतर नवजात बालकांना स्तनपान करतेवेळी मातेच्या व बालकाच्या आरोग्यावर भर देणे.
 • प्रसूती दरम्यान होणाऱ्या माता व बालकांच्या मृत्यूचे दर कमी करणे.
 • नवजात बालकांना कुपोषण सारख्या होणाऱ्या आजारापासून वाचविणे.
 • गर्भवाती अवस्थेत महिलांना मोलमजुरी सारख्या कामा पासून दर ठेवणे व त्यांना प्रसूती अगोदर व प्रसूती नंतर लागणाऱ्या खर्चासाठी आर्थिक मदत करणे.

पी एम मातृ वंदना योजना लाभार्थी

pm matru vandana yojana beneficiaries

 • 1/1/2017 नंतर राज्यातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या महिला तसेच स्तनपान करणाऱ्या माता या योजनेसाठी पात्र आहेत
 • केंद्र किंवा राज्य सरकारी नोकरीत सेवा करणारी गरोदर महिला आणि स्तनपान करणारी महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
 • जर एखाद्या महिलेला तिच्या गर्भधारणेच्या वेळी वेतनासह मातृत्व राजा मिळत असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषखालील महिलाना घेता येणार आहे.
 • जर एखाद्या महिलेचा नैसर्गिक गर्भपात झाला किंवा मृत बालक जन्मले असेल तर अशा परिस्थितीत देखील या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
 • या योजनेचा लाभ केवळ एकदाच घेता येईल, पहिल्या अपत्य पुरता लाभ.

pm matru vandana yojana benefits योजनेचा लाभ

 • शासन या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी 1 हजार रुपये तर दुसऱ्या टप्प्यासाठी 2 हजार रुपये तर तिसऱ्या टप्प्यातील 2 हजार रुपये आहे आर्थिक सहाय्य करते.
 • गर्भवाती माता जेंव्हा बाळाला रुग्णालयात जन्म देते अशा वेळेस जननी सुरक्षा योजनेअंतर्गत उर्वरित 1 हजार रुपये लाभार्थी महिलेला दिले जाते.
 • पात्र महिला लाभार्थी ला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत सासंथात्मक प्रसूती साठी दिले जाणारे प्रोत्साहन हे मातृत्व फायद्याचे गणले जाते. जेणेकरून एक्या महिलेला 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत सरकारने अधिसूचना केलेल्या संस्थेत किंवा शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस 3 टप्प्यात पहिल्या जीवित अपत्यापर्यंत 6 हजार रुपये एवढी रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यात जमा करण्यात येते.

पी एम मातृ वंदना योजनेच्या अटी

pm matru vandana yojana terms and conditions

 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांचे वय 19 वर्ष पूर्ण असणे अनिवार्य आहे.
 • लाभार्थी महिलेला पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर प्रसूती दरम्यान गर्भपात झाल्यास व भविष्यात गर्भधारणा झाल्यास राहिलेल्या उर्वरित हप्त्यांवर दावा करण्यास पात्र असतील.
 • 1 जानेवारी 2017 नंतर गर्भधारणा झालेल्या महिलां या योजनेअंतर्गत पात्र असतील.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला एकच वेळेस पात्र असतील.

pm matru vandana yojana documents योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • अधरकार्ड (पती, पत्नी)
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला व पतीचे संमती पत्र.
 • पासपोर्ट आकाराचे फोटो.
 • रेशन कार्ड
 • वीज बिल
 • घरपट्टी पावती.
 • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असावा
 • दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र
 • मोबाईल क्रमांक
 • बँक खाते (आधार संलग्न)

या योजनेचा लाभ 3 टप्यात विभागला गेला आहे त्या करिता कागदपत्रे.

पहिला टप्पा
 • अर्ज क्रमांक 1 भरून त्या सोबत माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र (MCP) व बँक किंवा पोस्ट खात्याची माहिती देणे अनिवार्य आहे.
दुसरा टप्पा
 • पहिल्या टप्प्यासाठी भरलेला अर्ज व गर्भधारणा झाल्यापासून 6 महिने नंतर प्रसूती पूर्व किमान 1 तपासणी ANC केल्याचे प्रमाणपत्र.
तिसरा टप्पा
 • लाभार्थ्यांनी रीतसर भरलेला फॉर्म 1 सादर करणे बंधनकारक आहे. बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच बाळाला पहिल्या लसीकरणाचा खुरक दिल्याची नोंद सादर करने आवश्यक आहे.

pm matru vandana yojana subsidy योजनेचा अनुदान लाभ वितरण

पहिला हप्ता
 • लाभार्थी महिलेच्या मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता 1 हजार रुपये प्राप्त करता येईल.
दुसरा हप्त
 • प्रसूती पूर्व किमान एक तपासणे केल्यास व गर्भधारणा करून 6 महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता 2 हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येईल.
तिसरा हप्ता
 • प्रसूती नंतर जन्मलेल्या अपत्याची जन्म नोंदणी करावी लागते, तसेच त्या बालकास BCG, OPV, DPD, हेप्तैतिस बी द्याव्या लागतात त्यानंतर तिसरा हप्ता 2 हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येते.

pm matru vandana yojana offline ragistration process योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

या योजनेचा लाभ घेण्यासाठी गावातील किंवा जिल्ह्यातील अशा स्वयं सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तालुका आरोग्य अधिकारी सादर योजनेचा अर्ज घ्यावा. या योजनेअंतर्गत मिळणार लाभ 3 टप्प्यात दिला जातो त्यामुळे 3 अर्ज दिले जातात. या अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आणि सर्व कागदपत्रे जोडून अर्ज दाखल करावा व पावती घ्यावी.

pradhan mantri matru vandana yojana online registration ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

 • अर्जदराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • होम पेज वर गेल्यानंतर log in form दिसेल
 • लॉग इन फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून लॉग इन बटण वरती क्लिक करावे.
 • लॉग इन केल्यानंतर अर्ज करू शकतात.
 • अर्ज करताना विचारली माहिती भरून अर्ज सबमिट करावा.
 • अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज भरावा.
योजनेचे नाव pm matru vandana yojana
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
लाभ6 हजार रुपये आर्थिक सहाय्य
योजनेचा अर्ज 1 PDF येथे क्लिक करा
योजनेचे लाभार्थीदेशातील महिला.
योजनेचा अर्ज 2 PDF येथे क्लिक
योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2017
योजनेचा अर्ज 3 PDF येथे क्लिक करा
राज्यमहाराष्ट्र राज्य
योजनेची माहिती PDF येथे क्लिक
विभागमहिला व बालविकास विभाग
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन / ऑफलाईन
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.