PM Suraksha Bima Yojana | प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना; प्रती महिना 1 रुपया गुंतवा आणि मिळवा 2 लाखांचा विमा: असा करा अर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत PM Suraksha Bima Yojana in marathi बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, PM Suraksha Bima Yojana प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना ही देशाचे अर्थ मंत्री अरुण जेटली 2015 सली जाहीर केली होती. त्यानंतर 8/4/2015 रोजी प्रधान मंत्री यांनी योजनेची औपचारिकरित्या सुरुवात केली. आपल्या देशातील गरीब आणि वंचित कुटुंबांना डोळ्यासमोर ठेऊन ही योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार कडून देशातील गरीब कुटुंबातील नागरिकांना अपघात विमा उपलब्ध करून दिला जातो. या योजनेअंतर्गत सरकारकडून विमा मिळवण्यासाठी भारत देशातील गरीब, वंचित आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत नागरिकांना वर्षाला फक्त 12 रुपये प्रीमियम भरावा लागतो. त्यानंतर तुम्ही प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकता.

7 वी पास 10 लाख तर 10 वी पास 25 लाखांपर्यंत अर्थ सहाय्य पहा येथे

या योजनेअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने या योजनेचा लाभ घेऊन अपघात वीमा काढला, आणि तो व्यक्ती मरण पावला तर त्या व्यक्तीने विमा काढलेली रक्कम त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या नोमेनी ला कव्हर म्हणून दिली जाते. जर एखाद्या व्यक्तीचा रस्त्यावर अपघात किंवा इतर कोणत्याही अपघातात मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची रक्कम या योजनेअंतर्गत सरकार कडून दिली जाईल. आणि जर एखादी व्यक्ती अपघातामुळे आपण झाली म्हणजे हात किंवा पाय निकामी झाला तर त्या व्येक्तीला या योजनेअंतर्गत सरकार कडून 1 लाख रुपयांचा विमा कव्हर म्हणून दिला जाईल. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांनसाठी ही योजना खूपच लाभदायक आहे.

एका सर्वेक्षण नुसार देशातील फक्त 20 टक्के जाणते कडे कोणत्या ना कोणत्या प्रकारचा विमा आहे. परंतु 80 टक्के जनता ही विम्यापासून वंचित आहे त्यामुळे आपल्या देशातील विमा धारकांची संख्या वाढविण्याचा या योजनेअंतर्गत एक चांगला उद्देश आहे

PM Suraksha Bima Yojana Purpose योजनेचा उद्देश

 • देशातील नागरिकांना या योजनेअंतर्गत सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
 • देशातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे
 • देशातील सर्व गरीब नागरिकांना कमी दरात विमा सुरक्षा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

PM Suraksha Bima Yojana Information योजनेचे ठळक मुद्दे.

 • विमा धरकचे वय 70 वर्ष पूर्ण झाल्यास ही विमा योजना संपुष्टात येईल.
 • या योजनेचा कालावधी 1 जून ते 31 मे असा राहील
 • एखाद्या व्यक्तीची जर विविध बँकेत अनेक खाते असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एक बँक खाते द्वारे या योजनेचा लाभ घेऊ शकेल.
 • ही योजना 1 वर्ष विमा संरक्षण देते. त्यानंतर लाभार्थ्यास या योजनेकरीता नुतूनिकरण करावे लागते.
 • विमा धारकांच्या बाचात खात्यात जर विमा हप्ता भरण्यासाठी पुरेशी रक्कम 12 रुपये नसेल तर सादर योजना संपुष्टात येईल.
 • विमा धारकांचे बचत खते काही कारणास्तव बंद झाले तर सादर विमा योजना संपिष्ठत येते.
 • लाभार्थ्यांच्या बचत खात्यातून या योजनेअंतर्गत दर वर्षी 12 रुपये वजा केले जातात.

प्रधांन मंत्री सुरक्षा विमा योजना पात्रता

PM Suraksha Bima Yojana Eligibility

 • देशातील 16 ते 70 वयोगटातील सर्व बचत खाते धारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • लाभार्थी देशाचा नागरिक असणे आवश्यक आहे.
 • या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
 • कोणत्याही बँकेतून किंवा पोस्ट खात्यातून अथवा सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेता येतो.
 • ज्या व्यक्तीचा विमा उतावरायचा आहे त्या व्यक्तीचे आधार कार्ड बँकेशी लिंक असणे आवश्यक आहे.

PM Suraksha Bima Yojana Benifits योजनेचा लाभ

विमा धारकांचा अपघाती मृत्यू

नैसर्गिक आपत्ती किंवा वधा मुळे विमा धर्माचा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये रक्कम त्याच्या वारसाला दिली जाते.

विमा धराकाचे स्थायी अपंगत्व

अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर विमा धारकांची डोळ्यांची पूर्ण आणि कधीही न बरी होणारी हनी म्हणजेच कायम स्वरुपी हनी झाल्यास, दोन्ही पाय निकामी झाल्यास अथवा दोन्ही हात निकामी झाल्यास एक डोळा/ एक हात/ एक पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास विमा धारकास 2 लाख रुपये प्रदान केले जातात.

स्थायी अंशिका अपंगत्व

तसेच एका डोळ्याची कधीही न बरी होणारी हनी झाल्यास 1 हात किंवा 1 पाय निकामी झाल्यास या योजनेअंतर्गत विमा धारकास 1 लाख रुपये दिले जातात. विमा योजनेअंतर्गत जर विमा धराकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यास काही हनी झाली आणि त्याचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत विम्याचा लाभ विमा धारकास मिळणार नाही तसेच आत्महत्या चां प्रयत्न करताना स्थायी अपंगत्व किंवा स्थायी आंशिक अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत विमा धारकास कोणताही लाभ मिळणार नाही.

प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत महत्वाच्या गोष्टी

 • या योजनेअंतर्गत विम्याच्या पॉलिसीची रक्कम 12 रुपये वर्षातून एकदा 31 मे ल वजा करण्यात येईल.
 • विमा पॉलिसीची रक्कम 12 रुपये न भरल्यास विमा पॉलिसी चे नूतनीकरण करण्यात येणार नाही.
 • विमा धराकालात्याच्या बचत खात्यामधून विम्याची प्रीमियम रक्कम ato debite होण्यासाठी संमती पात्र जोडणे आवश्यक आहे.
 • बँक खाते बंद झाल्यास सादर योजनेचा लाभ घेता येणार नाही.

PM Suraksha Bima Yojana Documents लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • जन्माचा दाखला
 • उत्पन्नाचा दाखला
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • मोबाईल क्रमांक
 • आधारकार्ड
 • पॅनकार्ड
 • बँक खाते (आधार लिंक असणे अनिवार्य आहे)

PM Suraksha Bima Yojana Registration Process योजनेचा अर्ज करण्याची पद्धत

 • प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आम्ही दिलेल्या शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन सदर योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल (आम्ही तो अर्ज खाली रकान्यात दिले आहे)
 • किंवा तुम्हाला तुमच्या बचत खते बँकेत जाऊन प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज बँकेत जमा करावा
 • त्यानंतर त्या कागदपत्रांची तपासणी करून विम्याची रक्कम 12 रुपये तुमच्या बँक खात्यातून बजा होतील अशा प्रकारे तुमचे विमा संरक्षण सुरू होईल.
 • तसेच तुम्ही पोस्ट खाते व सार्वजनिक विमा कंपन्या यांच्या माध्यमातून देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.

या योजनेअंतर्गत दावा करण्याची पद्धत

PM Suraksha Bima Yojana Claim Process

पहा एखाद्या विमा धरकाचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास प्रथम Claim Form भरावा लागतो व विमा धरकचा रुग्णालयात मृत्यू झाल्यास अर्जासोबत रगणालयाने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, औषध उपचारांची सर्व माहिती व कागदपत्रे जोडावी लागतात. जर विमा धारकांचा घरीच मृत्यू झाल्यास डॉक्टरांनी दिलेला मृत्यूचा दाखला Claim Form सोबत जोडणे आवश्यक आहे.

तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती मुळे विमा धराकला स्थायी अपंगत्व आल्यास रुग्णालयाचे Discharge Card आणि औषध उपचारांची सर्व माहिती जोडणे अनिवार्य आहे.

योजनेचे नाव PM Suraksha Bima Yojana
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
योजनेची सुरुवात 2015
योजनेचा अर्ज PDFयेथे क्लिक करा
विभागआरोग्य विभाग
दाव्यासाठी अर्ज PDFयेथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
उद्देशदेशातील नागरिकांना विमा सुरक्षा प्रदान करणे
संमती पत्र/घोषणा अर्ज PDF येथे क्लिक करा
लाभार्थीभारतीय नागरिक
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
लाभविमा सुरक्षा
अधिक योजनायेथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा