pm wani wi fi | पी एम वाणी योजना; आता मिळणार सर्वांना मोफत wi-fi..!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत pm wani wi fi पी एम वाणी योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, जसे की आपल्याला माहीतच आहे आजच्या युगात इंटरनेटचा वापर बऱ्याच ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात होतो. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टीव्ही इत्यादी करिता इंटरनेट गरजेचे आहे, इंटरनेट हा केवळ तांत्रिक शब्द न राहता तो आता जगातील तमाम नागरिकांची गरज बनला आहे. आधीच्या युगात माहिती तंत्रज्ञान प्रगतशील नसल्या कारणामुळे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक ठराविक कालावधी लागत होता. मागील काही वर्षांपासून इंटरनेटने खूप वेगाने प्रगती केली असल्यामुळे आता माहितीची देवाणघेवाण करिता कसलाही अधिक वेळ लागत नाही. इंटरनेट मुळे देशालातीलच नाही तर जगातील कोणतीही माहिती आणि व्यवहार करणे सोईस्कर झाले आहे. जगातील संपूर्ण देशातील शासनाने इंटरनेटचे महत्व जाणले आहे. त्याच कारणाने ब्रॉड बँड नेटवर्क शहरासह ग्रामीण भागातही जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात स्थापित केले जात आहे.

pm wani wi fi

pm wani

देशात शहरी भागासह ग्रामीण भागात देखील इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता केलेल्या सर्वे नुसार 100 इंटरनेट वापरकर्त्यांच्या मागे 38 वापरकर्ते इतके आहे. इंटरनेटचा वापर हे ग्रामीण भागातील साक्षरता तसेच आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्वाचे ठरत आहे, आणि याचा वापर सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाचा देखील आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ग्रामीण भागात सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी गरजेचे आहे. या वरील सर्व बाबींचा विचार करून भारत सरकारने आपल्या देशांतर्गत नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 9/12/2020 या बैठकीत pm wani wi fi म्हणजेच वाय – फाय एक्सेस नेटवर्क इंटरफेस ब्रॉडबँडच्या माध्यमातून प्रसार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आपण आजच्या या लेखात या योजनेबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून सविस्तर माहिती जाणून घ्यावी.

pm wani wi fi

pm wani wifi business

या योजनेअंतर्गत देशातील सर्वजणीक ठिकाणी मोफत वाय – फाय इंटरनेटची सुविधा सरकार कडून मिळणार आहे. तसेच ही योजना सरकारकडून पूर्णपणे मोफत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ब्रॉडबँड आणि इंटरनेट च्या माध्यमातून मोठी क्रांती घडवून आणणार आहे. या योजनेअंतर्गत देशातील छोटे दुकानदार, छोटे व्यवसायिक यांना या योजनेच्या माध्यमातून त्यांना सुविधा प्राप्त होणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक छोटे दुकानदार, छोटे व्यवसायिक सामान्य नागरिक यांच्या पर्यंत इंटरनेटची सुविधा मिळू शकेल. मोफत इंटरनेटचा वापर करण्याकरिता कोणताही शुल्क द्यावा लागणार नाही किंवा कोठ अर्ज करावा लागणार नाही.

pm wani wi fi

जन धन खातेदारांना मिळणार 10 हजार रुपये पहा येथे

पी एम वाणी योजना उद्दीष्टे

pm wani wi fi purpose
 • सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मोफत वाय – फाय इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
 • देशातील बहुतांश भागात इंटरनेटचा खूप कमी प्रमाणात वापर होत आहे. अशा ठिकाणी तेथील नागरिकांना मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणे.
 • या योजनेअंतर्गत देशातील जास्तीत जास्त नागरिक इंटरनेट ला जोडून वाढत्या डिजिटल अर्थवेवस्थे मुळे त्यांचे उत्पन्न वाढेल.
 • या योजनेअंतर्गत डिजिटल इंडिया ला प्रोत्साहन देणे मुख्य उद्देश आहे.

pm wani wi fi beneficiary योजनेचे लाभार्थी

 • देशातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
 • छोटे दुकानदार पासून 200 मीटरच्या आवारात येणाऱ्या सर्व नागरिक या मोफत इंटरनेटचा लाभ घेउ शकता.
 • मोबाईल चे इंटरनेट कनेक्शन सूरू केल्याशिवाय विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस च लाभ घेता येईल.

पी एम वाणी योजनेची वैशिष्ठे

pm wani wi fi features

 • सार्वजनिक डेटा कार्यालय अग्री गेटर जे शेवटच्या घटकांना एकत्र करतील. त्यांना कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. त्यांना या आग्री गेटरला फक्त नोंदणी करावी लागेल.
 • या करिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
 • अर्ज प्राप्त झाल्यापासून कामकाजाच्या 7 दिवसाच्या आत नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
 • रस्त भाव दुकानदार वाय – फाय राउटर खरेदी करून दुकानात बसवतील.
 • रास्त भाव दुकानदार चालवणारा दुकानदार सार्वजनिक डेटा कार्यालय म्हणून इंटरनेट सुविधा देईल या योजनेअंतर्गत देण्यात डेटांचा दर सरकार कडून निश्चित केला जाईल. ते आणखीन सरकारने निश्चित केला नाही. pm wani yojana
 • या योजनेअंतर्गत उपयोगकर्ता जो पिडियो च्या निर्देशानुसार इंटरनेटचा वापर करू इच्छितो त्याला ई – केवायसी प्रमाणीकरण केल्यानंतरच या योजनेचा लाभ घेता येईल.

pm wani wi fi benefits योजनेचे फायदे.

 • या इंटरनेटच्या माध्यमातून 5g सारखे आगामी मोबाईल तंत्रज्ञान उकृष्ट दर्जाची सेवा देऊ शकता.
 • या योजनेअंतर्गत देशाचे आत्मनिर्भर बाण्याच्या दिशेने आणखीन एक मजबूत पाऊल आहे.
 • या योजनेचा निती अंतर्गत 1 कोटी पब्लिक डेटा क्रियेशन करण्याची योजना आहे.
 • पी एम वाणी योजना ही देशाच्या समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शिक्षा व परस्पर संवाद आणि करू करण्याची पद्धती संपूर्णपणे बदलण्याची क्षमता ठेवते.
 • या योजनेच्या माध्यमातून वाय – फाय मोठी क्रांती होईल.
 • या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्याचबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
 • डिजिटल इंडियाच्या दिशेने पी एम वाणी योजनेच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या नागरिकांसाठी वरदान ठरेल.
 • घरोघरी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पी एम वाणी योजना सुरू केली आहे.

पी एम वाणी योजना अंतर्गत अर्ज कसा करावा

pm wani wi fi online registration

मित्रानो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, ही योजना सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे या योजनेची अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, या योजनेच्या अर्ज प्रक्रियेची सुरुवात होताच आम्ही तुम्हाला पुढील लेखाच्या माध्यमातून कळवू.

योजनेचे नाव pm wani wi fi
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
विभाग दळणवळण मंत्रालय भारत सरकार
श्रेणीसार्वजनिक वाय – फाय योजना
उद्देशसर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वाय – फाय सेवा उपलब्ध करून देणे
माहिती PDFयेथे क्लिक करा
लाभार्थी देशातील सर्व नागरिका
योजनेची सुरुवात9/12/2020
द्वारे सुरूकेंद्र सरकार
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पहा आमच्या व्हॉट्सॲप.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.