Power Tiller Yojana | पावर टिलर अनुदान योजना, 85 हजारां पर्यंत मिळणार अनुदान

नमस्कार शेतकरी मित्रानो आपण आज पाहणार आहोत Power Tiller Yojana बद्दल संपूर्ण माहिती.

सर्वांचे स्वागत आहे आपली योजना या साईट वरती आज आपण पाहणार आहोत Power Tiller Yojana बद्दल संपूर्ण माहिती चला तर मग जाणून घेऊया, शेती करायची म्हांतल की त्यासाठी आली औजारे यंत्रे आणि यंत्रा मध्ये सर्वात जास्त वापर पहिला तर ट्रॅक्टर चा होतो, तसेच पूर्वी शेतीचे कामे करण्यासाठी बैलाचा वापर केला जायचा आज पण बऱ्याच जागेवर बैलांचा वापर हा शेती करण्यासाठी होतो. पण आता जग बदलत चाललं आहे त्या सोबत शेतकऱ्यांचे ही काम चांगले आणि कमी वेळात व्हावे या साठी यंत्रांचा वापर केला जातो.

काही कालांतराने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर चा उपयोग सुरू झाला, आणि शेतीची कामे झटपट होऊ लागली एका ट्रॅक्टर क्या साह्याने शेतीची बरीच कामे जलद होऊ लागली, ते पाहता शेतीसाठी लागणार अनेक औजारे / यंत्र तयार होऊ लागली, आणि त्यातच शेतकऱ्यांना परवडेल अश्या Power Tiller हे यंत्र बाजारात आहे. या यंत्राद्वारे शेतकऱ्यांना ऊस बांधणे किंवा इतर शेती संबधित विविध कामे सोपे झाले आहे.

शेती संबधित शासनाच्या योजना

 • शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविते
 • कर्ज योजना
 • कृषी यांत्रिकीकरण योजना
 • प्रधानमंत्री सिंचन योजना
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
 • सौर कृषी पंप योजना
 • आणखी भरपूर सरकार अश्या योजना राबवत असते

अशा अनेक योजना सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत असते, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

Power Tiller Yojana पॉवर टिलर अनुदान योजना माहिती.

 • Power Tiller Yojana साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महा डी बी टी पोर्टल वरती नोंदणी करावी लागेल.
 • नोंदणी केल्या नंतर अर्जदाराची प्रोफाइल भरावी लागेल म्हणजेच आपली वयक्तिक माहिती, शेतीविषयक माहिती भरण्यासाठी कागदपत्रां नुसार भरावी लागेल.
 • आपण चुकीची माहिती भरल्यास Power Tiller Yojana मध्ये निवड झाल्या नंतर अर्जमधील माहितीमध्ये व कागदपत्रामधील माहिती मध्ये तफावत आढळल्यास आपला अर्ज बाद केला जाईल, त्यामुळे माहिती भरताना अचूक माहिती भरावी.

कुसुम सोलार सौर पंप योजनेची माहिती पाहण्या साठी येथे क्लिक करा

पॉवर टिलर अनुदान योजनेसाठी अनुदान किती मिळेल.

Power Tiller Yojana पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आधार लिंक असलेल्या बँक खात्यात अनुदान दिले जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांना आपले आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे.

 • 8 बी एच पी व त्या पेक्षा ज्यस्त क्षमता.
 • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 85,000/ रुपये अनुदान असेल.
 • सर्वसाधारण प्रवर्गासाठी 70,000/ रुपये अनुदान असेल.
 • 8 बी एच पी पेक्षा कमी क्षमता असेल तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती साठी 65,000/ रुपये तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50,000/ रुपये अनुदान असणार आहे.

पॉवर टिलर अनुदान योजनेसाठी पात्रता

Power Tiller Yojana Eligibility
 • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकरीच घेऊ शकतात.
 • महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • अर्जदार हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी यंत्राची लेखी मागणी मिळणे अनिवार्य आहे.
 • अर्जदाराच्या नावे कमीत कमी 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार शेतकऱ्याच्या नावे 7/12 व 8 अ असावा.

या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारी कृषी यंत्रे

Power Tiller Yojana machines
 • पॉवर टिलर 8 hp किंवा अधिक
 • पॉवर थरेशर
 • रोटाव्हेटर
 • पंप सेट 7.5 hp
 • झिरोटील सिड ड्रिल, शुगर केन कटर प्लांटर, बईदर, रीपर
 • स्प्रिंकलर सेट
 • पंप सेट
 • लेझर ल्यांड लेव्हलर
 • मल्टीक्राफ्ट प्लांट, रिज फेरो पलांटर, सीड ड्रिल
 • अरो ब्लास्ट स्पेअर्

Power Tiller Yojana साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड
 • 7/12 8अ उतारा
 • बँक खाते व पासबुक
 • मोबाईल नंबर

पॉवर टिलर योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Power Tiller Yojana Online Registration Process
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल
 • तिथे गेल्यानंतर अर्ज करा वरती क्लिक करा, नंतर कृषी यांत्रिकीकरण यामध्ये बाबी निवडा वरती क्लिक करा.
 • त्यानंतर कृषी औजरांच्या खरेदीसाठी अर्थ सहाय्य हा पर्याय निवडा.
 • तपशील या मध्ये पॉवर टिलर हा पर्याय निवडा.
 • एच पी श्रेणी मध्ये 8 एच पी हा पर्याय निवडा.
 • त्यानंतर जतन करा वरती क्लिक करा.
 • पुन्हा होम पेज वरती क्लिक करा व अर्ज करा वरती क्लिक करा.
 • आता अर्ज करा वरती क्लिक करा व पुन्हा पहा वरती क्लिक करा यामध्ये प्राधान्य क्रम निवडा.
 • त्यानंतर समोरील चौकोनात क्लिक करा सादर करा वरती क्लिक करा.
 • आता तुमचा अर्ज सादर केल्या नंतर तुम्हा अर्जाचे पेमेंट करावे लागेल.
 • पेमेंट साठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेत बँकिंग, यु पी आय द्वारे पेमेंट करू शकता.
 • पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुमच्या अर्जाची प्रिंट कडून घ्या
 • अशा प्रकारे या योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज करता येईल.

आपली आजची Power Tiller योजना पोस्ट कशी वाटली आम्हाला कॉमेंट द्वारे नक्की कळवा, आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजनेसाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा