Pradhan Mantri Shadi Shagun Yojana | प्रधान मंत्री शादी शागून योजना 2023; मुलींना मिळणार 51 हजारांचे आर्थिक सहाय्य! पहा अर्ज कसा करायचा.

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Pradhan Mantri Shadi Shagun Yojana प्रधान मंत्री शादी शगून योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, आपल्याला माहीतच आहे केंद्र सरकार जनसामान्यांच्या कल्याणच्या विविध प्रकारच्या योजना राबवित असते, ज्यातून जनसामान्यांना योग्य ती लाभ मिळवा. केंद्र सरकार अशीच एक योजना घुन आले आहे ज्याचे नाव Pradhan Mantri Shadi Shagun Yojana प्रधान मंत्री शादी शगुन योजना आहे. ही योजना मुलींसाठी खूपच महत्वाची आहे. यातून मुलींना 51 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

विद्यार्थी, वृद्ध, महिला, शेतकरी तसेच समाजातील प्रत्येक घटकानसाठी केंद्र सरकार बऱ्याच प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवित आहे. तर आपल्याला देशातील मुलींसाठी देखील केंद्र सरकार योजना राबवित आहे. देशातील अल्पसंख्याक मध्ये मुस्लिम समाजाची लोक संख्या जास्त आहे. आपण पाहतच आहात अपलसंख्याक मध्ये विशेषतः मुस्लिम समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय नाही. या मुलींची सुरक्षा, पोषण व उच्च शिक्षणासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. Pradhan Mantri Shadi Shagun Yojana

Pradhan Mantri Shadi Shagun Yojana 2023

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाअंतर्गत कार्यात असलेल्या “मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन” ने मुस्लिम समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शादी शगुन योजना मांडली होती. अल्पसंख्याक मंत्रालयाकडून ठराव मंजूर झाल्या नंतर 8/8/2017 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली. लग्न करण्यापूर्वी उच्च शिक्षण म्हणजेच पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक मुलींना या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 51 हजार रुपये देते. या योजनेअंतर्गत अल्पसंख्याक मुलींच्या शिक्षणात गैर सोय होणार नाही.

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना

शादी शगुन योजना च लाभ अल्पसंख्याक समाजातील मुलींनाच मिळतो. मुस्लिम, ख्रिचन, बौद्ध, जैन व पारसी या अल्पसंख्याक समाजातील मुलींनाच शालेय स्थरावर “बेगम हजरत महल” ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ ज्या मुलींना आहे त्याच मुलींना शादी शगुन योजनेचा लाभ मिळतो. या सोबतच 9वी आणि 10 वी शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुस्लिम मुलींना बक्षीस म्हणून 10,000/- देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या पूर्वी अशा मुस्लिम वर्गातील मुली ज्यांनी 11 वी आणि 12 वी चे शिक्षण पूर्ण केले होते त्यांना 10,000/- रुपये देण्यात आले आहे. PMSSY

योजनेअंतर्गत या लोकांना मिळेल फायदा

 • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी मुलगी किमान पदवीधर असावी.
 • या सोबतच ती मुलगी अल्पसंख्याक समाजाशी संबधित असावी.
 • बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • अशा परिस्थितीत मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिचन व पारसी या समाजातील मुलींना या योजनेचा लाभ मिळतो.

Pradhan Mantri Shadi Shagun Yojana Benefits योजनेचे फायदे

 • या योजनेअंतर्गत मुस्लिम समाजातील मुलींना त्यांचे उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले जाईल.
 • तसेच या योजनेअंतर्गत मुलींना 9 वी आणि 10 वी उत्तीर्ण झाल्या नंतर केंद्र सरकार कडून 10,000/- रुपयांची प्रोत्साहन रक्कम दिली जाईल.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थी मुस्लिम मुलींचे पदवीचे शिक्षण पूर्ण करून विवाह केल्या नंतर त्यांना अनुदान म्हणून सरकार कडून 51,000/- रुपयांची रक्कम मदत म्हणून दिली जाईल.

Pradhan Mantri Shadi Shagun Yojana Features या योजनेची वैशिष्ट्ये

 • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला मान्यताप्राप्त महाविद्यालयातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
 • PMSSY योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी अल्पसंख्याक समाजातील असणे आवश्यक आहे.
 • विवाह अनुदान योजना एका कुटुंबातील 2 मुलींनाच वैध असेल.
 • लाभार्थी मुलगी भारताची रहिवाशी असावी
 • मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे.
 • अल्पसंख्याक मुलीने लग्नापूर्वी कोणत्याही शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे अशा मुली या योजनेसाठी पात्र आहेत.
 • इतर मागास प्रवर्गातील नागरिकांना अर्ज करण्यासाठी विवाह अनुदान योजनेच्या आर्जा मध्ये ऑनलाईन प्राप्त केलेल्या जात प्रमाणपत्राचा अनुक्रमांक नुमुळ करणे अनिवार्य आहे.
 • मुलीच्या लग्नासाठी केलेल्या अर्जामध्ये मुलीचे वय लग्न होईपर्यंत 18 वर्ष आणि वराचे वय 21 वर्ष असणे बंधनकारक आहे.

प्रधान मंत्री शादी शगुन योजनेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

Pradhan Mantri Shadi Shagun Yojana Documents
 • ओळख पुरावा
 • बँक खाते
 • मोबाईल क्रमांक
 • आधार कार्ड
 • जातीचा दाखला
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • विवाह प्रमाणपत्र
 • उत्पन्नाचा दाखला

Pradhan Mantri Shadi Shagun Yojana Online Registration Process या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

 • सर्वात प्रथम तुम्हाला मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
 • या नंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
 • होम पेजवर तुम्हाला स्कॉलरशिप या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
 • या पेज वरती तुम्हाला शादी शगुन योजना फॉर्मच्या लिंक वरती क्लिक करावे लागेल. आणि अर्ज तुमच्या समोर उघडेल.
 • आता या अर्जामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी आणि त्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 • आणि शेवटी सबमिट बटण वरती क्लिक करून अर्ज सबमिट करा. आणि तुमच्या समोर नोंदणी स्लीप उघडेल.
 • त्यानंतर तुम्ही नोंदणी स्लीप डाऊनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट ही काढू शकता.
योजनेचे नाव Pradhan Mantri Shadi Shagun Yojana 2023
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
लाभ 51,000/- रुपये आर्थिक सहाय्य
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
योजना आरंभ8/8/2017
द्वारे सुरूप्रधान मंत्री नरेंद्र मोदी
उद्देशअल्पसंख्याक मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे
वर्ष 2023
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
विभागअल्पसंख्याक मंत्रालय
लाभार्थीअल्पसंख्याक समाजातील मुली
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.