Sanjay Gandhi Niradhar Yojana | संजय गांधी निराधार अनुदान योजना 2023; पात्रता, लाभ, अर्ज पद्धत: पहा सविस्तर माहिती.

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार अनुदान योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मितनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब आणि वंचित नागरिकांसाठी सतत नवनवीन लाभदायक योजना राबविल्या आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार अनुदान योजना होय. ही योजना सरकारच्या न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबात फक्त एकच लाभार्थी असल्यास सहाशे रुपये प्रति महिना आणि कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास नऊशे रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेत पात्र होण्यासाठी आपले नाव BPL कुटुंबाच्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे. किंवा कुटुंबाचे अवरशिक उत्पन्न 21 हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे. आणि केवळ महाराष्ट्र राज्यातील कायम रहिवाशी या योजनेसाठी पात्र आहेत.

65 वर्षा खालील निराधार स्त्री पुरुष, अंध, अपंग, आणि अनाथ लाभार्थी यांना मदत केली जाते. घटस्फोटीत स्त्रिया, प्रौढ स्त्रिया, वेश्यावेवसाया पासून मुक्त स्त्रिया यांना आर्थिक पाठबळ मिळते, जेणेकरून ते त्यांच्या उदरनिर्वाह साठी आणि दैनंदिन गरजाभागविण्यासाठी कोणावरती अवलंबून राहू नये.

रमाई आवास योजना पहा येथे

महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने Sanjay Gandhi Niradhar Yojana ही योजना सुरू करण्यात आली आहे. विधवा अपंग आणि आजारी गरजू व्यक्तींना आर्थिक मदतीचा हात देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यांना मासिक पेंशन क्या आधारावर आर्थिक मदत केली जाईल. राज्यातील लाभार्थ्यांना सरकारकडून पेन्शनचे पैसे मिळू शकतात या वरती अवलंबून सरकारने काहीं पात्रता निकष सिश्चीत केले आहेत.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Beneficiary योजनेचे लाभार्थी

 • क्षयरोग, कर्करोग, अर्धांगवायु, एड्स, कुष्टरोग, सेरेब्रल पाल्सी या कठीण आजारांमुळे जीवन न जगू शकणार स्त्री आणि पुरुष.
 • अनाथ मुले (18 वर्षाच्या खालील)
 • अपंग, मूकबधिर, मतिमंद, इत्यादी प्रवरगतिल स्त्री आणि पुरुष.
 • निराधार महिला, निराधार विधवा, महिला शेतमजूर.
 • तुरुंगवास भोगणाऱ्या कैद्याच्या पत्नीला या योजनेचा लाभ घेता येईल.
 • 35 वर्षाखालील आ विवाहित महिला.
 • देवदासी
 • वेश्यावेवसायातून मुक्त महिला.
 • तृतीयपंथी
 • अत्याचारित स्त्री.
 • घटस्फोट प्रक्रियेत असलेल्या आणि घटस्फोटित परंतु पोटगी न मिळालेल्या महिला.
 • आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी

Sanjay Gandhi Niradhar Yojana Purpose योजनेचा उद्देश

 • लाभार्थ्यांचे इतरावरील अवलंबून राहणे बंद करने.
 • त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे.
 • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे या योजनेअंतर्गत नागरिकांना अर्थ सहाय्य देऊन मदत करने हा आहे.
 • या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्रता, अटी व नियम

Sanjay Gandhi Niradhar Yojana Eligibility, Terms And Conditions
 • अर्जदार हा जमिनीचा मालक नसावा.
 • अर्जदाराला उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसावा.
 • अर्जदाराचे वय 65 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असावा.
 • अर्जदाराचे नाव दारिद्य्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार हा किमान 15 वर्ष महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • मुलींच्या बाबतीत हा लाभ त्यांना लग्न होईपर्यत किंवा त्यांना नोकरी लगे पर्यंत दिला जाईल (शासकीय, निमशासकीय, खासगी)
 • जोपर्यंत लाभार्थ्यांचे मुले 21 वर्षाचे होत नाहीत किंवा नोकरी मिळत नाही, तोपर्यंत लाभार्थी व बालकांना लाभ दिला जाईल.
 • मुलाला नोकरी मिळाल्यानंतर मुलाचे आणि कुटुंबाच्या उत्पन्नाचा विचार करून लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यात येईल.
 • मुलीच्या लग्नानंतर तिच्या पालक कुटुंबाला मिळणारे अनुदान सुरू राहणार आहे.
 • लाभार्थ्यांच्या एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न 21 हजारा पर्यंत असल्यास लाभार्थी योजनेस पात्र राहील.
 • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी मुलांची संख्या ही अट असणार आहे.
 • आई आणि वडील हयात नसल्याबद्दल तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित ग्रामविकास यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
 • ज्या स्त्रियांचे पतीचे निधन झाले आहे अशा स्त्रिया या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र राहतील.
 • लाभार्थी जर शासनाच्या इतर कोणत्याही मासिक योजनेचा लाभ घेत असेल तर त्यास अपात्र ठरविण्यात येईल.
 • लाभार्थी मरण पावल्यास त्याला दिले जाणारे आर्थिक साहाय्य बंद केले जाईल.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Beneficiary Check योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची तपासणी.

 • प्रत्येक वर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत एकदा सदर लाभार्थ्यांनी ज्यांचे जिथे खाते आहे तिथे बँक मॅनेजर कडे किंवा पोस्ट मास्तर कडे हजार राहावे लागेल आणि हयात असल्याची नोंद बँक मॅनेजर/ पोस्ट मास्तर यांच्याकडे करावी लागेल.
 • कोणत्याही कारणामुळे लाभार्थी बँकेत किंवा पोस्टात हजरराहू शकला नाही तर त्या लाभार्थ्यांनी नायब तहसिलदार, तहसीलदार, उप विभागीय अधिकारी यांच्या समोर उभे राहून हायती बाबतचे प्रमापणात्र सबंधित पोस्ट मास्तर किंवा बँक मॅनेजर यांच्याकडे सादर करावे.
 • कोणत्याही परिस्थितीत हयात पप्रमाणपत्र सादर केल्या शिवाय सादर लाभार्थ्यास 1 एप्रिलपासून आर्थिक साहाय्य देण्यात येणार नाही.
 • या योजनेत लाभ घेण्याऱ्या लाभार्थ्यांची पात्रता तपासणी प्रत्येक वर्षातून एकदा करण्यात येईल. या तपासणीत एखादा लाभार्थी अपात्र ठरत असेल त्याचे करणे कळवून त्या लाभार्थ्याचा लाभ त्वरित बंद करण्यात येईल.

संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत समाविष्ट जाती.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Included Caste
 • खुला प्रवर्ग
 • अनुसूचित जाती
 • अनुसूचित जमाती
 • भटक्या जमाती
 • इतर मागासवर्ग
 • विशेष मागासवर्ग
 • विमुक्त जाती.
निराधारांन प्रवर्ग
 • मुक बधीर
 • अस्थिव्यंग
 • मतिमंद
 • अंध
 • कर्णबधिर
आजार
 • क्षयरोग
 • कुष्ठ रोग
 • एड्स
 • पक्ष घात
 • प्रमोस्तशकघात
 • कर्करोग
 • इत्यादी दुर्लभ आजार.
महिलांचे प्रवार्ग
 • निराधार
 • घटस्फोट प्रक्रियेतील महिला
 • घटस्फोट झालेली परंतु पोटगी न मिळालेली महिला.
 • घटस्फोट झालेला परंतु योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी.
 • वेश्यावेवसायतून मुक्त झालेली महिला
 • शेत मजूर महिला
 • अत्याचारित महिला.
अनाथ मुले
 • मुलगा
 • मुलगी

Sanjay Gandhi Niradhar Yojana Benifits योजनेअंतर्गत मिळणारे फायदे

 • राज्यातील नागरिक सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • राज्यातील निराधार व्यक्तींना त्यांच्या जीवनातील दैनंदिन गरजाभागविण्यासाठी व उपजिविकेसाठी कोणावर अनलंबून राहण्याची गरज नाही.
 • या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी नागरिकास प्रती महिना 1000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते.
 • एक कुटुंबात या योजनेचे एक पेक्षा जास्त लाभार्थी असल्यास त्यांना प्रती महिना 1200/- रुपये दिले जाते.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Documents या योजनेअंतर्गत लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पॅनकार्ड
 • मतदान कार्ड
 • मारोहायो जॉब कार्ड
 • वाहन धारक परवाना
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • ओळखीचा पुरावा
 • निमशासकीय ओळखपत्र
पत्याचा पुरावा.
 • तलाठी / ग्रामसेवक/ मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या रहिवाशी असल्याबाबत चा दाखाला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला दाखला मान्य केला जाईल.
वयाचा पुरावा
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • रेशन कार्ड मध्ये किंवा मतदान यादी मध्ये नुमिद केलेल्या वयाचा पुरावा
 • ग्रामीण/ नागरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेला वयाचा दाखला.
उत्पन्नाचा पुरावा
 • तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखल किंवा दारिद्र्य रेषेखालील यादी मध्ये त्या व्यक्ती कुटुंबाचा समावेश असल्याबाबत चा संक्षेकीत उतारा.
रहिवाशी दाखला
 • ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवाशी असल्या बाबत चा पुरावा.
अपंग असल्या बाबतचे प्रमाणपत्र
 • अस्थिव्यंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर मतिमंद यांचे अपंग असल्या बाबत अधिनियम 1995 मधील तरतुदी प्रमाणे जिल्हा शलयचिकित्सक यांचे प्रमाणपत्र.
 • असमर्थतेचा / रोगाचा दाखला
 • जिल्हा शल्चिकित्सक शासकीय रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेला दाखला.
 • कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी किंवा निवासगृहाचा अंतरवासी नसल्याबाबत चा दाखला.
 • ग्रामसेवक, तहसीलदार, तलाठी यांच्या शिफारशी वरून दिलेला दाखला.
 • महिला व बालकल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला.
अनाथ असल्याचा दाखला
 • ग्रामसेवक / मुख्याधिकारी / प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गट विकास अधिकारी / प्रक्लप अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी संक्षिकीत केलेला दाखला.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Online Registration Process ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

stape 1

 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची सर्वात प्रथम तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
Sanjay Gandhi Niradhar Yojana
 • त्यानंतर नवीन युजर वरती क्लिक करा
 • आता तुम्हाला पर्याय 1 आणि पर्याय 2 दिसेल तुम्हा या दोन पर्याय सह अर्ज करू शकता.
 • पर्याय 1 वरती क्लिक करा.
 • आता तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाका आणि GET OTP वरती क्लिक करा.
 • आता तुमच्या मोबाईल वरती एक OTP येईल तो OTP टाकल्या नंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल.
 • युजर आयडी आणि पासवर्ड तयार केल्या नंतर लॉग इन करा.
STAPE 2
 • आता तुम्हाला होम पेज वरती जाऊन युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल.
Sanjay Gandhi Niradhar Yojana

STAPE 3

 • आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल पेज च्या डाव्या बाजूला तुम्हाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिसेल त्यावरती क्लिक करा.
 • आता तुम्हाला स्पेशल असिस्टंटस स्कीम वर टिक करा आणि प्रोसेस वरती कलिकणकरा.
 • त्यानंतर तुम्हाला स्पेशल असिस्तांस प्लॅन वर क्लिक करावे लागेल.
 • या नंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे वाचावी लागतील आणि start next वरती क्लिक करा.
 • आता तुम्हाला संजय गांधी निराधार अर्ज दिसेल या मध्ये विचारलेली सर्व माहिती भरावे लागेल.
 • या नंतर सेव्ह एप्लिकेशन्स वरती क्लिक करा.
 • अर्ज सबमिट केल्या नंतर तुम्हाला विनंती केलेल्या कागदपत्रांची PDF अपलोड करून अर्ज सबमिट करावा.

अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला 33 रुपये भरावे लागेल. पैसे भरल्यानंतर तुमचा अर्ज 30 दिवसांसाठी तहसील कार्यालयात मंजुरीसाठी जाईल. परंतु तुमचा अर्ज 30 दिवसा नंतरही मंजूर झाला नाही तर तुम्हाला सर्वासा तहसील कार्यालयात जावे लागेल. तुमचे सर्व कागदपत्रे सबमिट करावे लागतील. अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुर्ण होईल.

योजनेचे नाव Sanjay Gandhi Niradhar Yojana
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
विभागन्याय व विशेष सहाय्य विभाग
लाभार्थी राज्यातील नागरिक
अर्ज PDF येथे क्लिक करा
द्वारे सुरूमहाराष्ट्र सरकार
वर्ष2023
श्रेणीपेन्शन योजना
योजनेची माहिती PDF येथे क्लिक करा
राज्य महाराष्ट्र राज्य
लाभ 1000 तए 1200 रुपये
उद्देशनिराधार नागरिकांना आर्थिक मदत करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन किंवा ऑफलाईन
योजना आरंभ1980
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा