Savitribai Phule Scholarship | सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना; पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Savitribai Phule Scholarship सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील शिक्षिका, भारतीय समाज सुधारक शिक्षण तज्ञ आणि कवयित्री होत्या. महाराष्ट्र मध्ये त्यांची पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी भारतीय महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्या भारताच्या स्त्रीवादी चळवळीच्या प्रणेत्या मानल्या जातात. सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले या दोघांनी मिळून 1848 पुण्यातील भिडे वाडा येथे आधुनिक भारतीय मुलींच्या शाळेची स्थापना केली त्यांनी जात आणि लिंगाच्या आधारावर भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्याचा प्रयत्न केला.

मित्रांनो महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यामध्ये समाजातील सर्व स्थरावर तसेच समाजातील सर्व गटातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार कधी सरळ अनुदान देऊन त्रवकाधी या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप क्या स्वरूपात राज्यातील विद्यार्थ्यांना मदत करते. त्या पैले अशीच एक योजना म्हणजे Savitribai Phule Scholarship सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना.

Savitribai Phule Scholarship सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना

आपल्या राज्यातील बहुतांश कुटुंब दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत. कारण त्यांच्याकडे रोजगाराचे कायमस्वरूपी साधन नाही त्यामुळे तू आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाच्या गरजा भागू शकत नाहीत, आणि त्याचबरोबर ते आपल्या मुलांचे उच्च शिक्षण अशा परिस्थितीमध्ये पूर्ण करू शकत नाही. अशा कारणामुळे शिक्षण शिकण्याची इच्छा असूनही घरातील बिकट परिस्थितीमुळे तरुण-तरुणींना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते त्यामुळे त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक व सामाजिक विकास होत नाही. आजही मुलींना मुलांपेक्षा कमी महत्त्व दिले जाते आणि आत्ताच्या काळातही स्त्रीभ्रूणहत्या होत असून त्यांच्या शिक्षणाला महत्व दिले जात नाही व मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहतात.

मुलीच्या लग्नाची चिंता सोडा

यामध्ये काही वेळा अशी दिसून येते की काही कुटुंबे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी चढया व्याज दराने कर्ज घेतात आणि कर्जाची परतफेड वेळेवर न झाल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक व सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य शासनाने महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना राबविण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. Savitribai Phule Scholarship

Savitribai Phule Scholarship Purpose योजनेचा उद्देश

 • या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती देऊ केलेल्या दीर्घकाली आर्थिक सहाय्यचा उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देने व त्यांचे उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी पाय घालण्यास मदत करणे.
 • राज्यातील विद्यार्थ्यांचे या योजनेच्या माध्यमातून जीवनमान सुधारेल.
 • राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे.
 • राज्यातील विद्यार्थ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.
 • शिक्षणाचा अरख करण्यास असमर्थ असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची संधी प्रदान करने हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल.

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना वैशिष्टे

Savitribai Phule Scholarship Features
 • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.
 • या योजनेची अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली आहे त्यामुळे अर्जदार विद्यार्थ्यास कोणत्याही कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही.
 • सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेली राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.

Savitribai Phule Scholarship Terms And Conditions सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना नियम व अटी.

 • शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थिनीस या योजनेचा लाभ मिळणार नाही. या बाबत विद्यार्थिनीने आणि प्राचार्यने एकत्रित हमीपत्र भरून देणे अनिवार्य राहील.
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनीने त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
 • अर्थसहाय्य करिता विद्यार्थिनीच्या शैक्षणिक प्रगती बरोबर इतर उपक्रमातील सहभाग उदा. क्रीडा, कला, समाजसेवा विचारात घेण्यात येईल.
 • या योजनेअंतर्गत विद्यार्थिनीस गैरवर्तन, गैरशिस्थ, परीक्षेतील गैर प्रकार ई. बाबत शिक्षा झालेली नसावी.
 • विद्यार्थिनीचे नियमित अभ्यासक्रमात 75 टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. या संदर्भात प्राचार्यने दाखला देने आवश्यक राहील.
 • महाविद्यालय किंवा विद्यापीठ विभागामध्ये विद्यार्थिनीने नियमित अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असवा.
 • विद्यार्थिनीने मागील लगतच्या परीक्षेत किमान 50 टक्के गुण घेतलेले असावे. 50 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थींनींचा गुनानुक्रमे विचार करण्यात येईल.
 • सदरचे अर्थसहाय्य पात्र विद्यार्थिनींना संपूर्ण पदवी पदव्युत्तर काळात एकदाच देण्यात येईल.
 • महाविद्यालये किंवा विद्यापीठ शैक्षणिक विभागातील आ वेवसाईक अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या जास्तीत ज्यास्ट 10 व आव्यवसायिक पदुवत्तर अभ्यासक्रमातील जास्तीत जास्त 5 विद्यार्थिनी या योजनेसाठी पात्र राहतील.
 • पात्र विद्यार्थिनी 5 हजार रुपये अर्थ सहाय्य देण्यात येईल.
 • विद्यार्थ्यांनीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये पेंक्षा जास्त नसावे. या संबंधित तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना फायदे

Savitribai Phule Scholarship Benefits
 • या योजनेच्या साहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून भविष्यात चांगली नौकरी मिळवू शकतील व तसेच स्वतःचा एखादा उद्योग व्यवसाय सुरू करून बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करू शकतील.
 • या योजनेच्या साहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःचा सर्वांगीण विकास करतील.
 • या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
 • विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही,आणि त्यांच्या शिक्षणासाठी कोणाकडून जास्त व्याजाने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल.

Savitribai Phule Scholarship Documents लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

 • उत्पन्नाचा दाखला.
 • आधारकार्ड
 • पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, अपत्तिग्रस्थ विभागप्रमुख, प्राचार्य शिफारस पत्र.
 • मोबाईल क्रमांक
 • रहिवाशी दाखला
 • मार्कशीट
 • ईमेल आयडी
 • बँक खाते (आधार लिंक)
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Savitribai Phule Scholarship Online Registration Process
 • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम आम्ही खाली दिलेल्या रकाण्या मधील शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • होम पेज वरती new user वरती क्लिक करून log in आयडी आणि password तयार करावा लागेल.
 • आता तुम्हाला तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून log in करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तुम्हाला त्यावरती Apply For Scholarship या वरती क्लिक करावे लागेल.
 • आता Eligibility Number प्रविष्ट करा आणि शोध बतानावर्ती क्लिक करा जर तुम्ही प्रविष्ट केलेला पात्रता क्रमांक बरोबर असेल तर तो अर्ज उघडेल अन्यथा तो एक त्रुटी दाखवेल.
 • आता तुमच्या समो एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये सावित्री बाई फुले स्कॉलरशिप योजना फॉर्म उघडेल त्या मधे तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती भरायची आहे. आणि त्याच बरोबर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत. आणि त्यानंतर सबमिट बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • आता तुम्हाला तुमचा भरलेला फॉर्म दिसेल तुम्हाला तो प्रिंट करून घेता आहे.
 • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेचे नाव Savitribai Phule Scholarship
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
राज्यमहाराष्ट्र राज
द्वारा सुरू महाराष्ट्र शासन
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप सर्क्युलर PDF येथे क्लिक करा
लाभार्थीराज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी
विभागसावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे
उद्देशगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी अर्थी मदत
अर्ज करण्यासाठी युजर मन्यूअल येथे क्लिक करा
वर्ष2023
श्रेणी शिष्यवृत्ती योजना
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
स्कॉलरशिप16,000/- रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा