Sharad Pawar Gram Samriddhi Yojana | शरद पवार ग्रामीण समृध्दी योजना 2023; योजनेचे PDF, पहा सविस्तर माहिती!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Sharad Pawar Gram Samriddhi Yojana शरद पवार ग्रामीण समृध्दी योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आणि याच शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती मजबूत करण्यासाठी सरकार विविध योजना राबवित असते. त्यांच्या कल्याणासाठी त्यांचे जीवनमान उंचवण्याकरिता अशा योजना सरकार अमलात आणत असत. अशीच एक योजना म्हणजे Sharad Pawar Gram Samriddhi Yojana शरद पवार ग्रामीण समृध्दी योजना. या योजनेची संपूर्ण माहिती आपण या लेखात देणार आहोत. मित्रानो या योजनेची सुरुवात शरद पवार यांच्या नावाने करण्यात आली आहे, ही योजना शरद पवार यांच्या जन्म तारखे वेळेस म्हणेजेच 12 डिसेंबर 2020 ला सुरू करण्यात आली. त्यांना वाढदिवसाच्या निमित्त सन्मानित करण्याच्या उद्देशाने त्यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करून त्यांना शेती आणि जोड व्यवसाय मधून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Sharad Pawar Gram Samriddhi Yojana

ही योजना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी च्या साहाय्याने महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार आहे. तसेच मनरेगा रोजगार पण या योजनेला जोडला जाईल. रोजगार हमी विभाग ही योजना राबवित आहे, शेतकरी विकसित म्हणजे राज्य विकसित त्यामुळे गावातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. या योजनेच्या माध्यमातून गाई म्हाशिंसाठी गोशाळा, तसेच शेळ्या मेंढ्या करिता शेड बांधण्यात येणार आहे. आणि या योजनेअंतर्गत जर कोणाला पोल्ट्री फार्म शेड बांधायचे असेल तर त्या साठीही सरकार मदत करणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे केवळ 2 जनावरे असतील ते ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत गाय, म्हैस, शेळी यांची शेन साठून त्यांचे शेतीसाठी वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे.

व्यवसाय करिता मिळणार 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज

Sharad Pawar Gram Samriddhi Yojana Purpose योजनेचा उद्देश

 • राज्यातील नागरिकांनी गाय, म्हैस, शेळी, मेंढी पाळण्यासाठी प्रत्सहित करणे.
 • शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सशक्त व आत्मनिर्भर करणे.
 • शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे.
 • शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांसाठी म्हणजेच गाय, म्हैस, मेंढी, शेळी, यांच्या साठी उन, पाऊस, वरा यांच्या पासून संरक्षण व्हावे.
 • मुख्यतः म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी.
 • शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी शेड किंवा गोठा बंधण्याकरिता आर्थिक भांडवलाचा अभाव भासू नये किंवा ते कोणा इतरांवर अवलंबून राहू नये.

शरद पवार ग्रामीण समृध्दी योजना 2023 ची वैशिष्टे

Sharad Pawar Gram Samriddhi Yojana Features
 • या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आली आहे.
 • ही योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजना आहे.
 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांच्या बचावा करिता शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.
 • या योजनेअंतर्गत अर्ज पद्धत खूपच सोपी करण्यात आली आहे.
 • या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT मार्फत जमा करण्यात येईल.

गाय म्हैस करिता पक्का गोठा बंधने

मित्रानो आपल्या राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे गाई म्हशी अताताच, गाई म्हशी पालन हा शेतकऱ्याचा जोड व्यवसाय आहे ज्यातून ते दूध, शेणखत हे स्वतः वापरून त्याची विक्री ही करतात. बहुतांश शेतकऱ्यांकडे त्यांच्या जनावरांच्या निवाऱ्यासाठी गोठा उपलब्ध नसतो, तर काही जाग्यावर काच्चे गोठे बांधले जातात आणि त्यांच्या कडे गाई म्हशीचे शेन साठविण्यासाठी वेवस्था नसते या मुळे पावसाळ्यात त्या भागातील जमिनीला दलदलीच्या रूप येते व तिथे बांधलेली जनावरे त्या जाग्यावर बसत नाहीत. आणि अशा कारणांमुळे रोगाराई ही पसरू शकते.

 • या योजनेच्या माध्यमातून गाय व म्हैस यांच्या गोठ्याचे पक्के बांधकाम करण्यात येईल.
 • 2 ते 6 गुरांसाठी गोठा बांधण्यासाठी 77188/- रुपये अनुदान दिले जाईल.
 • शेतकऱ्यांकडे 6 पेक्षा जास्त आणि 12 पेक्षा कमी गुरे असतील किंवा त्यांना दुप्पट अनुदान दिले जाईल. म्हणजेच 154376/- रुपये दिले जाती
 • तसेच गुरांची संख्या 12 आणि 18 यांच्या मध्ये असेल तर त्यांना तिप्पट अनुदान दिले जाईल. म्हणजेच 231564/- रुपये अनुदान दिले जाईल
 • त्यात गुरांना पिण्याच्या पाण्याची सुधा वेवास्था करण्यात येईल. 200 लिटर क्षमतेची टाकी.

शेळी, मेंढी पालन करिता शेड बांधणे

शेळी पालन हे ग्रामीण भागातील उपजिविकेसाठी महत्वाचे साधन आहे. हे कमी उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेळी पालन या वेवसायकरिता या योजनेअंतर्गत त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शेळी व मेंढी पालनव्यवसाय वर आपले जीवन जगत असलेल्या गरीब कुटुंबे त्यांची आर्थिक स्थिती सक्षम नसल्या कारणाने ते नागरिक आपल्या शेळ्या आणि मेंढ्यांना निवारा देऊ शकत नाहीत. निवारा नसल्या कारणामुळे त्या शेळ्या आणि मेंढ्यांना संसर्गांचा प्रादुर्भाव होतो. अशी करणे रोखण्यासाठी सरकारने त्यांना शेड बांधण्यासाठी अनुदान देत आहे. यातून शेळी, मेंढी पालन करणारे नागरिक त्यांच्या माल मुत्रंपासून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत निर्माण करते. बहुतांश शेतकऱ्यांकडे 2 ते 3 शेळ्या असतात परंतु त्यांना तेवढ्यासाठी शेड बांधणे परवडत नसते. त्याकरिता या योजनेअंतर्गत अशा नागरिकांसाठी सुद्धा या योजनेतून अनुदान दिले जाते.

 • या योजनेच्या माध्यमातून 10 शेळ्यांच्या शेड बांधण्यासाठी सरकारकडून 49284/- रुपये अनुदान दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत जर 20 शेळ्या असतील दुप्पट अनुदान म्हणजेच 98568/- रुपये अनुदान दिले जाते.
 • तसेच या योजनेअंतर्गत जर 30 शेळ्या असतील तर तिप्पट म्हणजेच 147852/- रुपये अनुदान दिले जाते.
 • या योजनेअंतर्गतमिळणाऱ्या अनुदानातून शेड सिमेंट, विटा व लोखंडी सळई च्या आधारे बांधण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त 30 शेल्यांकरिता 3 पट अनुदान देण्यात येते.

कुक्कुट पालन करिता शेड बांधणे

 • या योजनेअंतर्गत जर शेतकऱ्यांकडे 100 पक्षी असतील तर शेड बांधण्यासाठी सरकार कडून अनुदान म्हणून 49770/- रुपये दिले जाते.
 • जर लाभार्थी कडे 150 पक्षी असतील तर त्यांना दुप्पट अनुदान म्हणजेच 99540/- रुपये दिले जाते.
 • जर एखाद्या लाभार्थ्याकडे 100 पेक्षा कमी पक्षी असल्यास त्यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 2 जमीनदार यांच्या सहित शेडची मागणी करायची आहे. लाभार्थ्याला शेड मंजूर होऊन बांधणी झाल्या नंतर 100 पक्षी आणणे बंधनकारक आहे.

Sharad Pawar Gram Samriddhi Yojana Benefits योजनेचा लाभ

 • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला पक्के गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते.
 • आणि शेळी पालन साठी पक्के शेड बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते.
 • तसेच कुक्कुटपालन करिता शेड बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागाचा त्या सोबतच रज्याचाही विकास होईल.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत वाढ होईल.
 • शेतकऱ्यांना त्यांच्या गुराचा गोठा बांधण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • या योजनेतून बांधण्यात आलेल्या गोठा आणि शेडच्या माध्यमातून गुरांचे व शेळी मेंढीचे उन, पाऊस, वारा या पासून रक्षण होईल.
 • गुरांना व शेळी मेंढीना अनुदानातून बांधण्यात आलेल्या शेड व गोठ्यात कोणतेही संसर्ग होण्याची शक्यता नाही.

Sharad Pawar Gram Samriddhi Yojana Terms And Conditions योजनेच्या अटी

 • या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच पात्र असतील
 • या योजनेसाठी इतर राज्यातील शेतकरी यांना लाभ घेता येणार नाही.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांनालाभ घेण्यासाठी त्यांच्या नावांवर शेतजमीन असणे अव कागदपत्रे असेन आवश्यक आहे.
 • प्रत्येक योजनेच्या अनुदांनकरिता वेगवेगळा अर्ज करने बंधनकारक आहे.
 • असलेल्या पशूंचे GPS मध्ये टायपिंग करणे आवश्यक आहे.
 • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र केवळ ग्रामीण भागातील शेतकरीच असतील.
 • या योजनेचा लाभ एका कुटुंबाला फक्त एकदाच घेता येईल.

शरद पवार ग्रामीण समृध्दी योजना लागणारी आवश्यक कागदपत्रे

Sharad Pawar Gram Samriddhi Yojana Documents
 • आधारकार्ड
 • रेशनकार्ड
 • मतदान कार्ड
 • जन्म दाखला
 • जातीचे प्रमाणपत्र
 • मोबाईल क्रमांक
 • उत्पन्न प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षापासून रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • लाभ न घेतलेचे प्रमाणपत्र
 • नाहरकत प्रमाणपत्र
 • ग्रामपंचायत शिफारस पत्र
 • अल्पभूधारक असल्याचे प्रमापटे
 • पशुधन असल्याचे प्रमाणपत्र
 • अर्जदाराकडे मनरेगा प्रमाणपत्र व जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

Sharad Pawar Gram Samriddhi Yojana Application Process अर्ज करण्याची पद्धत

 • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या ग्राम पंचायत मध्ये जाऊन य योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • किंवा आम्ही दिलेल्या लिंक वरून तुम्ही अर्ज डाऊनलोड करू शकतात.
 • अर्ज मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज ग्रामपंचायत मध्ये सादर करावा व पोच पावती घ्यावी.
 • अशा प्रकारे तुमचा अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेचे नावSharad Pawar Gram Samriddhi Yojana
एप्लिकेशन फॉर्म PDFयेथे क्लिक करा
लाभार्थी राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी
योजना सुरुवात12 डिसेंबर 2020
योजना माहिती PDFयेथे क्लिक करा.
द्वारे सुरूमहाराष्ट्र सरकार
राज्यमहाराष्ट्र राज
शासनाचा GR येथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धतसध्या ऑफलाईन
वर्ष 2023
श्रेणीराज्य सरकारी योजना
विभागरोजगार हमी विभाग महाराष्ट्र राज्य
उद्देशशेतकऱ्यांना समृद्ध करून ग्रामीण भागाचां विकास करणे
अधिक योजनायेथे क्लिक करा

आजचा आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.