Shasan Aplya Dari Yojana | शासन आपल्या दारी योजना; जत्रा शासकीय योजनांची: पहा सविस्तर माहिती..!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Shasan Aplya Dari Yojana बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, राज्य सरकार राज्यातील नागरिकांसाठी साठी त्यांच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित असते अशा योजनेतून नागरिकांचा फायदा व्हावा त्यांना लाभ मिळवा या उद्देशाने महाराष्ट्र सरकार अशा प्रकारच्या योजना राबवित असते. राज्याचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण राज्यभरात शासन आपल्या दारी Shasan Aplya Dari Yojana हे अभियान राबविण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक समाजातील नागरिकांना शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा असा मुख्य उद्देश या योजनेचा आहे. या अभियानाचा शुभारंभ नुकताच सातारा मध्ये 14/5/2023 रोजी करण्यात अला. मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या वेळी 22 हजाराहून अधिक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे.

या अभियानाला नागरिकांन मार्फत उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत शासना मार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रत्येक कल्याणकारी योजनांचा सामान्य नागरिकांना कोणत्याही अडथल्याविना मिळत आहे. आणि Shasan Aplya Dari Yojana शासन आपल्याला दारी योजनाचे काम व्यापक स्थरावर राबविण्यात येत असून या करिता सर्व यंत्रणा कार्यान्वित आहे. या अभियानाच्या यशासाठी 16000 योजना दुत नेमले आहेत. मुख्यमंत्री सचिवालय तसेच प्रत्येक जिल्ह्यात जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

Shasan Aplya Dari

 • महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी Shasan Aplya Dari या अभियानाची माहिती व्हावी या करिता महाराष्ट्र सरकारने या उपक्रमासाठी जवळपास 50 कोटी रुपयांच्या खर्चास आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली आहे.
 • सर्व सामान्य नागरिकां पर्यंत शासनाच्या सर्व योजनेची माहिती व्हावी या करिता नियोजन विभागाने jatra shasakiy Yojana chi “जत्रा शासकीय योजनांची सर्व सामान्यांच्या विकासाची” हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
 • नियोजन विभागाने या अभियानाचे नाव शासन आपल्या दरी असे केले आहे.
 • या योजनेच्या संदर्भात जाहिरात करण्यासाठी अंदाजे 50 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
 • आर्थिक व प्रशासकीय मान्यता 52 कोटी 90 लाख 80 हजार 240 रुपयांची देण्यात आली आहे.

शासन आपल्या दारी योजनेचे उद्दीष्टे

Shasan Aplya Dari Purpose

 • मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अधिकाऱ्यांमध्ये कार्यक्षम समन्वयाची हमी देण्यासाठी एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
 • जिल्हा नियोजन आणि विकास समिती आणि विधानसभेचे सदस्य स्थानिक विकास क्षेत्र योजना निधी पैकी प्रत्येकी 20 लाखांचा निधी देखील या करिता वापरण्यात येऊ शकतो.
 • नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी 13 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या सरकारी निर्देशानुसार या सर्व समस्यांचे निराकरण हा कार्यक्रम करेल.
 • जनतेची कऱ्य पूर्ण करण्यासाठी किंवा दिलेल्या कार्यक्रमाचे फायदे प्राप्त करण्यासाठी राज्यातील नागरिकाने आयोजित केलेल्या शिबिरात येणे आवश्यक आहे, जेणेकरून ते या योजनेचा फायदा मिळवू शकतील.

Shasan Aplya Dari Benefits योजनेचा लाभ

 • या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना एकच छताखाली शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता देखील करून दिली जाणार आहे.
 • या योजनेअंतर्गत शासन सर्वसामान्य नागरिकांच्या थेट दारी येणार आहे.
 • राज्यातील सर्व सामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अथवा त्या योजनांचा अर्ज करण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या
 • या सर्व गोष्टीतून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा या करिता महाराष्ट्र सरकारने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला आहे.
 • भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष निमित्त प्रत्येक जिल्ह्यात एकूण 27 लाख नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोचविण्याचा प्रयत्न आहे.
 • कमीत कमी काळामध्ये जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यपद्धती देखील निश्चित केली आहे.
 • बहुतांश नागरिकांना अशा शासकीय योजनांची माहिती देखील नसते, असेही नागरिक या योजनेअंतर्गत शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकतील.

शासन आपल्या दारी योजनेची कार्यपद्धत

Shasan Aplya Dari
 • या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व सामान्य नागरिकांना एकच छताखाली विविध प्रकारच्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
 • या योजनेअंतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
 • सर्व सामान्य लाभार्थ्यांना तहसील कार्यालय, पंचायत समितीचे आरोग्य विभाग
 • ग्राम पंचायत, कृषी एकात्मिक बलविकास, भूमी अभिलेख, पशुवैद्यकीय आदी विभागांतर्गत सर्व शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
Shasan Aplya Dari Yojana

यामध्ये रेशन कार्ड, शासकीय प्रमाणपत्र अधिवास, नॉन क्रिमीलेअर, जात प्रमाणपत्र, आधार नोंदणी आणि दुरुस्ती, उत्पन्नाचा दाखला, संजय गांधी योजना, मतदार नोंदणी, प्रधान मंत्री मातृ वंदना योजना, विवाह नोंदणी, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र, सुकन्या समृध्दी योजना, कुटुंब कल्याण योजना, सलोखा योजना यांचा समावेश आहे.

शासन आपल्या दारी योजनेचा GR

औषध बियाणे वाटप, महा डी बी टी, पशू तपासणी, कुपोषित बालकांची तपासणी, जमीन मोजणी, कृषी अवजारे वाटप, भूमापन, आरोग्य योजना, सुकन्या समृध्दी योजना, रमाई आवास योजना, आधार जोडणी, किसान क्रेडिट कार्ड, पशू संवर्धन प्रशिक्षण, ज्येष्ट नागरिक ओळखपत्र, मालमत्ता पत्रिका आदींचा समावेश आहे.

स्थानिक फायद्यासाठी दोन दिवसीय शिबीर

 • राजयभरातील जिल्हा प्रशासनाना आपल्या कार्य क्षेत्रात दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 • ही शिबिरे अधिकृत केंद्र म्हणून काम करतील.
 • या शिबिरा मार्फत नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता येईल.
 • या शिबिरा मार्फत आवश्यक कागदपत्रे मिळतील.
 • सातारा जिल्हयात सुमारे 75 हजार नागरिकांना लाभ देण्याचे आहे.

विभागीय निधीचा वापर

 • शिबिरांचे आयोजन सुलभ करण्यासाठी आदिवासी विकास, ग्राम विकास सामाजिक न्याय, शालेय शिक्षण, कृषी, कौशल्य विकास
 • या सारख्या विविध विभागांना दिलेला निधी वापरण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेला आहे.
 • तसेच विधानसभा सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना आणि जिल्हा नियोजन आणि विकास समिती यांच्या कडील निधी देखील वापरत आणला जाऊ शकतो.

या योजनेअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार

 • रक्तदाब शिबीर
 • शेतकरी ते ग्राहक थेट बाजार
 • दिव्यांगणा साहित्य वाटप.
 • रोजगार मेळावे.
 • कृषी शिबीर
 • आरोग्य शिबीर.
योजनेचे नाव Shasan Aplya Dari Yojana
अधिकृत वेबसाईट —————————
वर्ष2023
योजनेची सुरुवात 2023
उद्देशनागरिकांना एका छताखाली शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे
श्रेणीमहाराष्ट्र सरकारी योजना
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
द्वारे सुरूमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
PDF येथे क्लिक करा
विभागमहाराष्ट्र शासनाचे विविध विभाग
अधिक योजना येथे क्लिक करा.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.