Stand Up India Scheme | स्टँड अप इंडिया योजना; उद्योग व्यवसाय करिता मिळवा तत्काळ कर्ज: असा करा ऑनलाईन अर्ज!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Stand Up India Scheme स्टँड अप इंडिया योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो, या योजनेअंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकांना सक्षम बनविणे आणि त्यांना स्वतंत्र होण्यास सक्षम करने हे उद्दीष्ट आहे. ही योजना महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या करिता आहे यांना उद्योग क्षेत्रात उतरविणे आणि व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मदत करणे. या योजनेची सुरुवात 5 एप्रिल 2016 रोजी केंद्र सरकार मार्फत महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या समुदायातील उद्योजकांना पाठिंबा देण्याचा एक भाग म्हणून Stand Up India Scheme स्टँड अप इंडिया योजना सुरू केली आहे.

Stand Up India Scheme In Marathi

भारतातील उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नागरिकांना त्यांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. उद्योग व्यवसाय सुरू करताना कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि नागरिकांना होणारा त्रास पाहून ही योजना सोप्या पद्धतीने सुरू केली आहे. आपल्याला माहीतच आहे केंद्र सरकार गरीब आणि वंचित नागरिकांसाठी अशा प्रकारच्या अनेक आणि नागरिकांच्या कल्याणकारी योजना राबवित असते. केंद्र सरकार देशातील आर्थिक दृष्ट्या कमजोर, गरीब, वंचित उमेदवारांना अनेक प्रकारचे आर्थिक सहाय्य देते जेणेकरून ते नागरिक स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतील. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 10 लाख ते 1 कोटी पर्यंत उद्योग व्यवसाय कर्ज मिळू शकते. ही कर्ज योजना खासकरून महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या करिता आहे. केवळ हेच लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत प्राधिकरण एकूण प्रकल्प खर्चाच्या 75 टक्के कव्हर करतील लाभार्थ्याला उद्योजकाला एकूण खर्चाच्या 10 टक्के येवढे खर्च करावे लागेल.

Stand Up India Scheme

Stand Up India Scheme या योजनेअंतर्गत महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रत्येक बँकेच्या शाखेद्वारे त्यांचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. कर्जाच्या स्वरूपात ही मिळणारी आर्थिक मदत त्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यास सक्षम करेल. या योजनेचा लाभ केवळ ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट म्हणजेच प्रथम उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी असेल. या योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य त्यांनाच मिळेल जे व्यापार, सेवा, उत्पादन क्षेत्रात नवीन उद्योग व्यवसाय सुरू करत आहेत.

Stand Up India Scheme

काय आहे स्टँड अप इंडिया योजना

Stand Up India Scheme ही योजना मुख्यतः महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती समाजातील लाभार्थ्यांनसाठी ज्यांना नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे. या योजनेद्वारे सेवा, व्यापार आणि उत्पादन या संबंधित कोणत्याही क्षेत्रात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कर्जाच्या रुपात आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास भांडवल गुंतवणूक करण्यास मदत करेल. या योजनेअंतर्गत खास करून महिलांना खूप लाभ मिळणार आहे, त्यांना या योजनेतून स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यास आर्थिक सहाय्य केले जाईल.

Stand Up India Scheme

Stand Up India Scheme स्टँड अप इंडिया योजना फक्त 2025 पर्यंत सुरू राहणार

स्टँड अप इंडिया योजना आता 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. आणि हे आर्थिक सहाय्य 10 लाख ते 1 कोटींपर्यंत असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला फक्त एक फॉर्म (अर्ज) भरावा लागेल आणि उर्वरित परवाना प्रक्रिया स्वयंचलित असेल.

या योजनेअंतर्गत लाभार्थी 3 प्रकारे कर्ज घेऊ शकता, सर्वात प्रथम म्हणजे बँकेच्या शाखेतून घेता येईल, दुसरे म्हणजे AAP Stand Up India Portal द्वारे घेऊ शकता, आणि तिसरे म्हणजे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर द्वारे कर्ज घेऊ शकता. लाभार्थ्याला या मिळणाऱ्या कर्जाचे व्याजदर खुपाचंकमी असते आणि ह कर्ज लाभार्थी 7 वर्षाच्या आत परतफेड करू शकता. व्यापाऱ्यांन 1 रूपे डेबिट कार्ड दिले जाईल त्यांकर्ड च वापर करून कर्ज मिळवण्यासाठी व कर्जाची परतफेड करण्यासाठी तसेच त्यांचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी देखील केला जाईल. या योजनेअंतर्गत एक डिजिटल पोर्टल तयार केले गेले आहे, तिथे या योजने संबंधित सर्व माहिती दिली गेली आहे. लाभार्थी या पोर्टल वरती जाऊन कराजासाठी अर्ज करू शकतो. तसेच या पोर्टलद्वारे हॅण्ड होल्ड सपोर्ट, क्रेडिट माहिती आणि फायनान्स संबंधित इत्यादींची माहिती घेऊ शकता.

Stand Up India Scheme

Stand Up India Scheme Purpose योजनेचे उद्दीष्टे

या योजनेअंतर्गत देशातील महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील नागरिकांना प्रगत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सरकार या नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करून त्यांचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी एक संधी देत आहे. जे नागरिक आपला स्वतःचा एक उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांना या योजनेअंतर्गत बँकेद्वार कर्ज उपलब्ध करून दिले जाते. लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम 10 लाख ते 1 कोटी रुपये असेल.

Stand Up India Scheme Benefits योजनेचे फायदे

 • केंद्र सरकार मार्फत महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील नागरिकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
 • या योजनेचा लाभ मुख्यतः देशातील महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना होणार आहे.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रूपे कार्ड आणि प्रशिक्षण याचाही लाभ मिळणार आहे.
 • या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या उद्योग व्यवसाय यांना 3 वर्षा पर्यंतची इन्कम टॅक्स ची सुत देण्यात येणार आहे.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थीकर्ज घेऊन उद्योग व्यवसाय सुरू केल्यानंतर कर्ज परतफेड करिता 7 वर्षाचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे.
 • या योजनेअंतर्गत उद्योग व्यवसाय सुरू करून स्वतः सक्षम बनून इतरांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
 • या योजनेअंतर्गत महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य ही मिळेल.

स्टँड अप इंडिया योजना पात्रता

Stand Up India Scheme Eligibility
 • अनुसूचित जाती व अनुसूचित जाती मधील सर्व नागरिक
 • नवीन उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या सर्व प्रवर्गातील महिला.
 • गैर – वयक्तिक उपक्रमांच्या बाबतीत 51 टक्के हिस्सा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, किंवा महिला उद्योजकांकडे असावा.
 • इंटरप्रयजेस सुरू करण्याकरिता कर्ज घेणारा लाभार्थी कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेचा डिफॉल्टर नसावा.
 • या योजनेअंतर्गत उद्योजकाने सर्वात प्रथम व्यापार क्षेत्र, उत्पादन किंवा सेवा क्षेत्रात सुरुवात केली पाहिजे.
 • या योजनेअंतर्गत असणारी वयोमर्यादा लाभार्थ्यांचे वय 18 वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
 • ही योजना केवळ ग्रीन फिल्ड प्रकल्पासाठी वैध आहे. म्हणजे उद्योग व्यवसाय किंवा असा व्यवसाय जो उद्योजकाने प्रथमच सुरू केला आहे.

Stand Up India Scheme Documents योजनेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे.

 • आधारकार्ड
 • पॅनकार्ड
 • बँक खाते पासबुक
 • व्यवसाय पत्ता प्रमाणपत्र
 • भागीदारी कराराची प्रत
 • जर व्यावसायिकाने जागा भाड्याने घेतली असेल तर भाड्याचं अहवाल.
 • मतदान कार्ड
 • जातीचा दाखला (महिलांसाठी आवश्यक नाही.)
 • आयकर रिटर्न प्रत
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • प्रकल्प अहवाल.

स्टँड अप इंडिया योजनेचा अर्ज करण्याची पद्धत

Stand Up India Scheme Online Registration Process
 • सर्वात प्रथम तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
 • तिथे आल्या नंतर तुम्हाला अधिकृत वेबसाईटच्या होम पेज वरती सर्वात खाली दवी कडे You May Access Loan या मध्ये दिलेल्या पर्यायमधून Apply Here वरती क्लिक करावे लागेल.
Stand Up India Scheme
 • त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला नवीन उद्योजक वरती क्लिक करावे लागेल. त्यानंतर खाली तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी टाकावी लागेल त्यानंतर तुम्हाला जनरेट OTP वरती क्लिक करावे लागेल.
 • OTP जनरेट झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला त्यातील दिलेला एक अर्ज भरावा लागेल.
 • त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती वेवस्थिरीत्या भरून सबमिट बटण वरती क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि परवाना प्रक्रिया स्वयंचलित होईल.
योजनेचे नाव Stand Up India Scheme
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
श्रेणी केंद्र सरकार योजना
वर्ष2023
द्वारे सुरूकेंद्र सरकार
योजनेची सुरुवात 5 एप्रिल 2016
उद्देशमहिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिलांना व नागरिकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य करून त्यांना प्रोत्साहित करणे
लाभार्थीअनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्व प्रवर्गातील महिला.
विभागवित्तीय सेवा विभाग (DFS), वित्त मंत्रालय, भारत सरकार
अधिक योजना येथे क्लिक करा

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा