svamitva scheme | पी एम स्वामित्व योजना; ई-प्रॉपर्टी कार्ड: जमिनीचा मालकी हक्क! कर्ज योजना

pm swamitva yojana | swamitva yojana official website | svamitva nic in | Pradhanmantri Swamitva Yojana | Pradhanmantri Swamitva Yojana Maharashtra | प्रधानमंत्री स्वामित्व योजना मराठी | Pradhanmantri Swamitva Yojana Marathi | प्रधानमंत्री स्वामित्व योजना महाराष्ट्र | Pradhanmantri E Property Card Yojana | pm svamitva scheme

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत svamitva scheme स्वामित्व योजना बद्दल माहिती चला तर मग जाणून घेऊया. आपण या लेखात पाहणार आहोत स्वामित्व योजना काय आहे? स्वामित्व योजनेचे फायदे काय आहेत? या योजनेचे वैशिष्ठे काय आहेत? स्वामित्व योजनेची पात्रता काय आहे? ही योजना केव्हा सुरू करण्यात आली? या योजनेचे लाभार्थी कोण आहेत अशा अनेक प्रकारच्या प्रशांनबद्दल आपण माहिती पाहणार आहोत या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती जाणून घ्यावी चला तर मग जाणून घेऊया.

मित्रानो भारत सरकार आपल्या देशातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित असते अशीच एक योजना म्हणजे svamitva scheme. या योजनेच्या नावाचा पूर्ण अर्थ म्हणजे Survey Of Village And Mapping With Improvised Technology In Village Area असा आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना E Property Card वाटप केले जाते. या योजनेची सुरुवातिची घोषणा देशाचे पंतप्रधान यांच्या कडून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे svamitva scheme launch date 24 एप्रिल 2019 रोजी करण्यात आली

svamitva scheme

आपण पाहतच आहात आपल्या देशातील बहुतांश भागात जमिनीच्या मालकी हक्कावरून नेहमी वाद निर्माण होत असतात, त्याच बरोबर ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या कागदपत्रां बद्दल योडी ती माहिती नसते, अश्या कारणांमुळे त्या गरीब नागरिकांच्या जमिनीवर भूमाफिया हे जबरदस्तीने कब्जा करून घेतात. या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने swamitva yojana योजना सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. Pmsy

pm swamitva yojana

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोन च्या साहाय्याने मोजमाप केले जाईल आणि मोजमाप केलेल्या जमिनीचा नकाशा तयार केला जाईल, आणि उपलब्ध कागदपत्रांच्या पुरावा नुसार त्या जमीन मालकाला त्यांच्या जमीन मालकीचे प्रमाणपत्र म्हणजेच Ec- property card (ई प्रॉपर्टी कार्ड) दिले जाईल. या योजनेचा लाभ देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिक पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करतात व पिढ्यानपिढ्या तिथे राहतात परंतु त्यांच्या जवळ त्या जागेचा कोणताहि मालकी हक्क नसल्यामुळे त्यांना बँकेकडून कर्ज मिळत नाही व ते इतर योजनाचा लाभ ही घेऊ शकत नाहीत. Pmsy

मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि लायसेन्स योजना पहा येथे

svamitva scheme

या योजनेच्या माध्यमातून जे जमिनीचे मूळ मालक आहेत त्यांना E Property Card वितरित करण्यात येते, व जमीन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर मॅसेज येईल त्या वर क्लिक करून ते त्यांचे E Property Card डाऊनलोड करू शकतात

svamitva scheme features स्वामित्व योजनेची वैशिष्ट्ये

 • या योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.
 • जागेच्या हक्क साठी भांडण तंटा होणार नाही.
 • या योजनेची सुरुवात केंद्र सरकार द्वारे करण्यात आली आहे.
 • या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती डिजिटल नकाशे, तयार केलेले प्रॉपर्टी कार्ड, सर्वेक्षण, चौकशी इत्यादी प्रकारची माहिती पाहू शकता.

svamitva scheme purpose स्वामित्व योजनेचे उद्दिष्ट

 • जमीन मालकांना त्यांचे आर्थिक हेतू साध्य करण्यासाठी त्यांना त्यांच्या E Property Card चा वापर करता यावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • जमिनीची मापिंग करणे आणि योग्य त्या मालकांना त्यांच्या जागेचा हक्क मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • ग्रामीण वस्ती असलेल्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी व हक्काच्या जमीन मालकांना संपत्ती कार्ड जरींकरण्यासाठी आर्थिक आणि कायदेशीर सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
 • ग्रामीण भागातील विकासाला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
 • जमिनीच्या मालकी हक्काची होणारे वाद थांबविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
svamitva scheme
पी एम स्वामित्व योजनेची अमलबजावणी
svamitva project
 • E Property Card चे वितरण :- या योजनेअंतर्गत जमीन मालकांना त्यांचे E Property Card मिळतील याची खात्री करून पारदर्शक आणि जबाबदार प्रक्रियेद्वारे संपती कार्ड वितरित केले जाते.
 • प्रॉपर्टी कार्ड तयार करणे :- सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर हक्काच्या जमीन मालकांना प्रॉपर्टी कार्ड दिले जातात. या प्रॉपर्टी कार्ड मध्ये मालकाचे नाव, जमिनीचे स्थान, क्षेत्र आणि इतर संबंधित तपशिलासह आवश्यक माहिती असते.
 • देखरेख आणि मूल्यमापन :- अमलबजावणी प्रक्रियेची खूप बारकाईने निरीक्षण केले जाते. व योजनेच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सुधारणेसाठी क्षेत्र ओळखण्यासाठी नियतकालिक मूल्यमापन केले जाते.
 • ग्रामीण वस्तीच्या जमिनींचे सर्वेक्षण :- योजनेच्या पहिल्या टप्प्यात ग्रामीण वस्ती असलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करून त्यांच्या सीमा अचूकपणे निर्धारित केल्या जातात.
 • भूमी अभिलेखा सह एकत्रीकरण :- सर्वेक्षण करताना गीला केलेला डेटा विद्यमान भुमि अभिलेख प्रणाली मध्ये एकत्रित केला जातो. त्यामुळे एक व्यापक आणि अद्यावत जमीन डेटा बेस तयार केला जातो.

svamitva scheme benefits स्वामित्व योजनेअंतर्गत मिळणारे लाभ

 • कर्ज घेताना बँकेत e Property Card दाखून कर्ज घेणे सोपे होईल.
 • देशातील आदिवासी बांधवांना जमीन मालमत्तेची कायदेशीर कागदपत्रे मिळण्यास मदत होईल.
 • या योजनेअंतर्गतग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीचे ऑनलाईन देखरेख करने सोपे होईल.
 • या योजनेमुळे शासनाला नवीन डिजिटल आराखडा तयार करण्यास मदत होईल.
 • या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विकास कामांना वेग येईल.
 • या योजनेअंतर्गतजमिनीचे वाद थांबतील.
 • सदर योजना आत्मनिर्भर भारत च्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.
 • जमीन संपती वर मालकी हक्क असल्यामुळे तरुणांना व्यवसाय व शासनाच्या योजनाचा लाभ व कर्ज मिळण्यासाठी मदत होईल.
 • या योजनेमुळे जमिनींवर होणारा गैव्यवहारास अळा बसेल.
 • या योजनेअंतर्गत गैरव्यवहार आणि भूमाफिया वर रोख लावता येईल.
 • मालकी हक्क असणाऱ्या जमीन मालकाच्या नावावर अचूक जमिनीची नोंद करण्यास मदत होईल.
 • गावातील ग्राम पंचायतीला जमिनीची योग्य कर आकारणी करण्यास मदत होईल.
svamitva scheme

स्वामित्व योजनेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे

svamitva scheme documents
 • आधारकार्ड
 • पॅनकार्ड
 • राशन कार्ड
 • मतदान कार्ड
 • घरपट्टी पावती
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • लाईट बिल.
 • सदर जागेत हिस्सेदारी नसावी.
 • सदर जागेवर लाभार्थ्याचा मालकीहक्क असणे अनिवार्य आहे.
 • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

प्रधान मंत्री स्वामित्व योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

pradhanmantri swamitva Yojana ragistration process

 • या योजनेचा अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन नाही
 • स्वामित्व योजनेची अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे.
 • अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या ग्राम पंचायत मध्ये जाऊन स्वामित्व योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • अर्ज मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्यावी लागेल
 • नंतर सर्व कागदपत्रे जोडून घ्यावी लागतील.
 • भरलेला आरज व जोडलेली कागदपत्रे ग्राम पंचायत मध्ये जमा करावी लागेल.
 • अर्ज जमा केल्या नंतर तुमच्या मोबाईल क्रमांकवरती के मॅसेज येईल.
 • त्यावर तुम्हाला तूमचे E Property Card डाऊनलोड करता येईल
 • तसेच राज्य सरकारद्वारे देखील कार्ड वितरीत केले जाते.
योजनेचे नावsvamitva scheme पी एम स्वामित्व योजना
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
लाभार्थीग्रामीण भागातील नागरिक
स्वामित्व योजनेची कार्यपद्धती PDF येथे क्लिक करा
लाभE Property Card वितरण
स्वामित्व योजनेची अमलबजावणी शासनाचा आदेश PDF येथे क्लिक करा
विभागग्राम विकास विभाग
योजनेची सुरुवात24 एप्रिल 2020
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
अधिक योजना येथे क्लिक कर

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा