Vruksh Lgvad Yojana | वृक्ष लागवड अनुदान योजना, आपल्या शेतात, बांधावर वृक्ष लागवड साठी मिळणार अनुदान.

मित्रानो, आपण पाहतच आहेत राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी सातत्याने कल्याणकारी वीविध योजना राबवत असते. त्यातच काही योजना गावपातळीवर असतात अशीच एक योजना आहे Vruksh Lgvad Yojana वृक्ष लागवड अनुदान योजना. पंचायत समिती मार्फत अनेक योजना आपल्या गावामध्ये येत असतात परंतु त्याची आपल्याला पूर्णपणे माहिती नसते, अशीच एक योजना एक योजना आहे जी शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

Vruksh Lgvad Yojana शेतात किंवा बांधावर वृक्ष लागवडीसाठी अनुदान योजना, या योजनेचा फायदा झाडे आपल्या शेतात लाऊन किंवा शेताच्या बांधावर लाऊन घेऊ शकतो. कोण कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील, या योजनेसाठी कोण कोणती आवश्यक कागदपत्रे लागतील, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र किंवा अपात्र असतील हे आपण आज या लेखात पाहणार आहोत.

बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसाय कर्ज योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतात वृक्ष करताना केवळ वान जमीन शासकीय जमिनीवरील लागवड पुरेशी नसून खासगी फळ क्षेत्र शेतावरील बांध तसेच क्षेत्र शेतकऱ्यांनी लागवड केल्यास हे उद्दीष्ट सहज साध्य होणार आहे.

योजनेची उद्दीष्टे

 • शासनाने वृक्ष लागवडीसाठी कोणकोणते उद्दीष्ट हाती घेले आहे पाहूया.
 • आपल्याला माहीतच आहे की 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट शासनाने ठेवण्यात आले होते.
 • तसेच आता देखील शासनाने एक उद्दीष्ट समोर ठेवलेलं आहे.
 • शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पडजामिनी मध्ये किंवा शेताच्या बांधावर झाडे लावली तर त्याने शासनाचे उद्दीष्ट पूर्ण होणार आहे.
 • सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात वृक्ष लागवड योजनेस मंजुरी दिली आहे.
 • या योजेअंतर्गत वयक्तिक शेतकरी स्वतःच्या जमिनीवर वृक्ष लागवड करू शकणार आहे.
 • यायिजनेसाठी शासन शेतकऱ्यानं अनुदान देणार आहे.
 • या योजनेबद्दल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी चे अधिकृत कृषी अधिकारी विनय कुमार अवटे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे.

Vruksh Lgvad Yojana योजनेत कोणकोणते शेतकरी भाग घेऊ शकतात.

 • अनुसूचित जाती
 • अनुसूचित जमाती
 • विभक्त जाती
 • बहातक्या जाती
 • दारि्र्यरेषेखालील शेतकरी
 • स्त्रिकर्ता असलेले कुटुंब
 • जमीन सुधारणांचे लाभार्थी
 • शारीरिक दृष्टया विकलांग व्यक्ती करता असलेले कुटुंब
 • इंदिरा आवास योजने खालील लाभार्थी
 • या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये भाग घेता येणार आहे.
Vruksh Lgvad Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
 • योजनेचा अर्जदार हा जॉब कार्ड धारक असावा.
 • लाभार्थी नावे जमीन असावी, सातबारा 8 अ उतारा जोडलेला असावा.
 • विहित नमुन्यात ग्राम पंचायत कडे अर्ज करावा.
 • जातीचे प्रमाणपत्र किंवा दारिदर्यरेषेखालील असल्याचा दाखला.
 • योजनेअतर्गतलागवड करण्यात येणारी झाडे व त्याच्या 3 वर्षाच्या खर्चाचा मापदंड वरील मापदांडत समाविष्ट बाबी.
 • योजनेच्या मंजुरीनंतर झाडे लागवड करून ती जिवंत ठेवण्या बाबत संमतीपत्र जोडावे.
 • त्यासाठी जमीन तयार करने.
 • खड्डे खोदणे.
 • कुंपण करणे
 • मती व खत मिश्रणाचे खड्डे भरणे.
 • रोपे कलमाची लागवड करणे.
 • नंग्या भरणे.
 • खत देणे.
 • पाणी देणे .
 • निंदनी पीक संरक्षण.
 • इत्यादी गोष्टी करणे आवश्यक आहे.
योजनेचा प्रस्ताव जमा करण्यासाठी
 • ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांकडे प्रस्ताव सादर करा.
 • जर ग्राम सेवकांवर विश्वास नसेल तर ग्राम सेवकांकडे न जाता थेट पंचायत समिती जाऊन त्याची माहिती घेतली तरी चालेल.
 • पंचायत समिती मध्ये हा प्रस्ताव दाखल केल्या नंतर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुदान मिळण्यासाठी 90 टक्के तर जिराईत झाडांसाठी 75 टक्के जिवंत झाडे राखणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ कसा घ्यावा

Vruksh Lgvad Yojana आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी यजनेअंतर्गत नाव नोंदणीकृत जॉब कार्ड प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.

Vruksh Lgvad Yojana योजनेत सहभागी होण्यास काय करावे.

 • ग्रामपंचायत कडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल.
 • ग्रामपंचायतीच्या मासिक ग्राम सभेत हा अर्ज घेण्यात येईल.
 • ग्राम सभेने सादर लाभार्थी व काम करण्याचा अर्ज मंजूर केल्या नंतर सामाजिक वनीकरण विभागाकडून कामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळा्यानंतर लाभार्थी स्वतः गावातील इतर मजूर काम पूर्ण करतील.
 • योजनेच्या कामगारांना त्यांची मजुरी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
 • योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयाशीच शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.

आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा