Yashwantrao Chavan Gharkul Yojana | यशवंतराव चव्हाण घरकुल योजना 2024: मिळणार 1.30 लाख रुपयांचे अनुदान!

नमस्कार मित्रांनो आपले मनापासून स्वागत आहे आपली योजना या मराठी वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2024 यशवंतराव चव्हाण घरकुल योजना 2024 बद्दल माहिती, या करिता आपण हा लेख पूर्ण वाचून घ्यावा आणि सविस्तर माहिती समजून घ्यावी चला तर मग सुरू करूयात.

Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2024

मित्रानो, राज्य सरकार राज्यातील विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या घरकुल योजना राबवित असते. यामध्ये प्रधान मंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना या सारख्या योजनांचा समावेश आहे. यासोबतच Yashwantrao Chavan Gharkul Yojana यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा देखील समावेश आहे.

व्यवसाय करण्यासाठी मिळणार 5 लाखांचे कर्ज, येथे क्लिक करा

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गातील नागरिकांचा विकास होऊन त्यांचे राहणीमान उंचावे व आर्थिक परिस्थिती सुधारावी या अनुषंगाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेला राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या नावाने ओळखले जाते.

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचे PDF

Yashwantrao Chavan Gharkul Yojana

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या अटी व शर्ती

Yashwantrao Chavan Gharkul Yojana Terms And Conditions

 • अर्जदाराने या पूर्वी राज्य सरकारच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतला नसावा.
 • लाभार्थी 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत एकाच ठिकाणी वास्तव्यास असावा.
 • अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपयांपेक्षा कमी नसावे.
 • अर्जदाराकडे स्वतःचा मालकीचे पक्के घर नसावे.
 • अर्जदार हा भूमिहीन असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • यशवंतराव चव्हाण घरकुल योजना केवळ ग्रामीण भागासाठी लागू आहे.
 • या योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एका वेक्तीस मिळेल.
 • अर्जदार हा कच्च्या घरात किंवा झोपडीत राहणारा असावा.

या योजनेअंतर्गत कुटुंबांना खालील प्रमाणे प्राधान्य

 • भटकंती करून जीवन जगणारे.
 • पूरग्रस्त भागातील बाधित लाभार्थी
 • महिला
 • अपंग
 • पालात राहणारे
 • दारिद्रयरेषेखालील लाभार्थी
 • विधवा महिला.

यशवंतराव चव्हाण घरकुल योजना कागदपत्रे

Yashwantrao Chavan Gharkul Yojana Documents

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • जातीचा दाखला
 • उत्पन्न दाखला
 • महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणारे प्रमाणपत्र
 • या आधी कोणत्याही घरकुल योजना लाभ न घेतल्याचे 100 रू च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र.

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा अर्ज कुठे करावा?

Yashwantrao Chavan Gharkul Yojana Form

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही समाजकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असल्याने लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार नाही. लाभार्थ्यांना जिल्ह्याच्या जिल्हा सहायक आयुक्त समाजकल्याण येथे जाऊन ऑफलाईन पद्धतीने वरील सर्व कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागेल.

आमचा आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि अश्याच नवनवीन शासनाच्या योजना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा